कुटुंबाला गावाला पाठवून स्वीकारली कोरोनाग्रस्तांच्या सेवेची दीक्षा

diksha barave
diksha barave

महाळुंगे पडवळ (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील चास- ठाकरवाडी येथील दीक्षा बबनराव बारवे या गेली तीन महिन्यापासून पिंपरी चिंचवड येथील वाय.सी.एम. हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे रुग्ण असलेल्या आयसीयू वार्डमध्ये स्टाफ नर्स या पदावर काम करत आहे.

तसेच, आपल्या कुटुंबाला आपल्यापासून असणारा धोका ओळखून त्यांना गावी पाठवून स्वतः हॉटेलमध्ये राहून कोरोनाच्या रुग्णांची अविरतपणे सेवा व उपचार करून आपले कर्तव्य पार पाडत आहे.

चास- ठाकरवाडीचे सरपंच बबन मारुती बारवे व महाळूंगे पडवळ गावची कन्या सौ. सुलभा बबन बारवे यांची दीक्षा या कन्या आहेत. त्या घरच्यांची व नातेवाईकांची इच्छा नसताना आपल्या वडिलांची सामाजिक बांधिलकी व गावाकडील लोकांना  वैद्यकीय मदत करण्याची भावना म्हणून आयसीयूमधील कोविड १९ च्या रुग्णांची पहिल्या दिवसापासून सेवा करत आहे. महत्त्वाचे म्हणजे सेवेत रुजू होताना पहिल्या दिवसापासून हे काम करण्याची संधी मिळाली, असे त्यांनी सांगितले. त्यांना अजुन सेवेत कायम स्वरूपात करून घेतले नसतानाही, आपण रुग्णांची सेवा करण्यासाठी शिक्षण घेतले आहे, याची जाणीव ठेवून निस्वार्थी भावनेने त्या आपले कर्तव्य बजावत आहे.
       


हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करताना आपल्या कुटुंबियांच्या सोबत राहिल्यास आपल्यामुळे कुटुंबियांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, ही अडचण ओळखून दीक्षा यांनी आपले काका व शिवसेनेचे आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे  यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची अडचण शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना सांगितली. त्यांनी प्रयत्न करून ग्रामीण भागातील सर्व कर्मचाऱ्यांची हॉस्पिटल प्रशासनामार्फत पंचतारांकित हॉटेलमध्ये रहाण्याची सोय केली.

सतत ३ महिने कुटूंबापासून अलिप्त राहून आपल्या सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवून आपण समाजाचे काही तरी देणं लागतो, या भावनेने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, परिणामांची कल्पना असतानासुद्धा दीक्षा आपले कर्तव्य बजावत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.
 - बबन बारवे
दीक्षा यांचे वडिल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com