Maharashtra cyber police investigating a ₹1.5 crore fraud case where a senior citizen was cheated using fake NIA calls linked to the Pahalgam terror case.
पुणे: पहलगाम हल्लाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) तुमची चौकशी करण्यात येणार असल्याची भीती दाखवून कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी दीड कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.