esakal | बारामतीतील या पोलिस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप 
sakal

बोलून बातमी शोधा

police

या गंभीर स्वरुपाच्या आरोपांबाबत मार्च महिन्यापासून लेखी तक्रार देऊनही काहीच कार्यवाही होत नाही, ही बाब गंभीर असल्याचा आरोप संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. या संदर्भात

बारामतीतील या पोलिस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांची खातेनिहाय चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कारभारी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रशांत नाना सातव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. 

वाहनचालकांनो, तुमच्यासाठी आहे ही महत्त्वाची बातमी

एका महिलेने पाटील यांच्या संदर्भात केलेल्या गंभीर स्वरुपाच्या आरोपांबाबत मार्च महिन्यापासून लेखी तक्रार देऊनही काहीच कार्यवाही होत नाही, ही बाब गंभीर असल्याचा आरोप संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. या संदर्भात प्रतिज्ञापत्रक सादर करुनही यात कारवाई तर दूरच, मात्र चौकशीही झालेली नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. या प्रकरणी संबंधितांची चौकशी होऊन कारवाई व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. 

पेट्रोलच्या दरवाढीचा दस का दम

दरम्यान प्रशांत सातव यांनी अजित पवार यांना पत्र लिहून औदुंबर पाटील व त्यांच्या सहकारी अधिकारी व कर्मचा-यांनी विविध प्रकरणात चुकीच्या पद्धतीने कारवाई करून अनेक गैरप्रकार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पाटील यांच्या या पूर्वीच्याही काळातील काही बाबी निदर्शनास आणून देणार असल्याचे सातव यांनी नमूद केले आहे. 

पुरंदरमध्ये एकाच दिवसात सापडले तीन कोरोनाबाधित

दरम्यान, या संदर्भात सातव यांनी केलेल्या तक्रारीबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याकडे चौकशीचे काम सोपविले असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली. काही प्रकरणात शिरगावकर यांच्याही नावाचा उल्लेख असल्याने त्या प्रकरणाबाबत इतर सक्षम अधिका-याकडे त्याबाबत चौकशी सोपविली जाईल, असेही मोहिते यांनी सांगितले.