Maratha Reservation : सर्व्हर ठप्प झाल्याने सर्व्हेक्षणाच्या कामात अडथळा ; मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सर्व्हेक्षण सुरु

मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगातर्फे आजपासून (ता. २३) सर्व्हेक्षण सुरु झाले. पण पहिल्याच दिवशी दुपारी सर्व्हर ठप्प झाल्याने सर्वेक्षणाच्या कामात अडथळा निर्माण झाला. मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीमध्ये ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी राज्यात आंदोलन सुरु आहे.
pune
punesakal

पुणे : मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगातर्फे आजपासून (ता. २३) सर्व्हेक्षण सुरु झाले. पण पहिल्याच दिवशी दुपारी सर्व्हर ठप्प झाल्याने सर्वेक्षणाच्या कामात अडथळा निर्माण झाला.

मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीमध्ये ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी राज्यात आंदोलन सुरु आहे. पण राज्य सरकारने ओबीसीतून आरक्षण देण्याऐवजी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले जाईल असे आश्‍वासन दिले आहे. ही मागणी अमान्य करत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरु करण्यासाठी मोर्चा काढला आहे. आज त्यांचा मुक्काम पुण्यात आहे.

दरम्यान मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाला मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी २३ जानेवारी ते ३१ जानेवारी या दरम्यान घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले आहे. यामध्ये शहरातील १२ लाख कुटुंबापर्यंत पोहचून सर्वेक्षण केले जाणार आहे. पुणे महापालिकेने २ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

pune
Pune : लोणीत नवीन मंदिराच्या कलशारोहण व प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त कायस्वरूपी हिंदु धर्म ध्वजाची उभारणी

वाजल्यापासून महापालिकेचे कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या भागात सर्वेक्षण करत होते. सकाळच्या सत्रात सर्वेक्षणाच्या कामाला गती आली होती. पण दुपारनंतर सर्वेक्षण करण्यासाठी तयार केलेल्या ॲपचे सर्व्हर ठप्प झाले. त्यामुळे माहिती संकलन करण्याचे काम थांबले. प्रगणकांनी त्याबाबत पर्यवेक्षकांकडे तक्रारी केल्या, त्यांचे निवारण होऊ शकले नाही.

एक अर्ज भरण्यासाठी किमान १५ मिनीट

सर्वेक्षण करताना खुल्या गटातील कुटुंबाची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. त्यामध्ये १०० पेक्षा जास्त प्रश्‍न आहेत. नागरिकांकडून व्यवस्थित माहिती मिळाली तर कमीत कमी एक अर्ज भरण्यासाठी १५ मिनिटे लागत आहेत, असे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सर्वेक्षणात येणाऱ्या अडचणी

  • - अर्ज भरताना इंटरनेट गेले तर पुन्हा संपूर्ण सुरुवातीपासून अर्ज भरावा लागतो.

  • - प्रगणकास मोबाईलचे जीपीएस सुरु ठेवावे लागते त्यामुळे मोबाईलची बॅटरी लवकर संपते

  • - चार्जिंगसाठी सोबत पॉवर बँक नसल्याने चार्जिंगसाठी जागा शोधावी लागते

  • - पर्यवेक्षकांना तांत्रिक माहिती नसल्याने प्रगणकाच्या समस्या लगेच सुटत नाहीत

‘‘शहरात आजपासून मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. सकाळच्या सत्रात काम चांगले झाले, पण दुपारनंतर सर्व्हर संथ झाल्याने माहिती भरण्यात अडचणी आल्या.’’

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com