धायरी गणातील पोटनिवडणुकीत सात जणांचे अर्ज दाखल

राजेंद्रकृष्ण कापसे
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

धायरी पंचायत समिती गणातील गावाचं समावेश महापालिकेत झाला. येथील पंचायत समिती सदस्या अश्विनी पोकळे होत्या. त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने ती जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक होत आहे.

खडकवासला : धायरी पंचायत समिती गणाचा पोटनिवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या बुधवारी शेवटच्या दिवशी एकूण सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

धायरी पंचायत समिती गणातील गावाचं समावेश महापालिकेत झाला. येथील पंचायत समिती सदस्या अश्विनी पोकळे होत्या. त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने ती जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक होत आहे. 

राज्यात आजपासून उद्धव सरकार  

उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या नाव (कंसात पक्षाचे नाव) सीमा बापूसाहेब सणस (अपक्ष) छाया नितीन हगवणे (राष्ट्रवादी काँग्रेस) सुवर्णा राजेंद्र करंजावणे (शिवसेना) नीलम दत्तात्रय सणस (भाजप) माया संतोष हगवणे (अपक्ष) तर पल्लवी महेंद्र शेलार यांनी शिवसेना आणि अपक्ष असे दोन अर्ज भरलेले आहेत. 

शपथविधी सोहळ्यासाठी नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचं निमंत्रण

''छाननी मधील हरकती बाबत न्यायाधीशांकडे अपील करण्याची तारीख 2 डिसेंबर आहे. अपिलावर निकाल देण्याची संभाव्य तारीख पाच डिसेंबर आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख चार डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत आणि त्याचदिवशी चिन्ह वाटप होणार आहे. प्रत्यक्ष मतदान 12 डिसेंबर रोजी, तर मतमोजणी 13 डिसेंबरला होणार आहे.''असे निवडणूक निर्णय अधिकारी एस. आर. हवाळ यांनी सांगितले.

वार झाला मुंबईत जखम झाली दिल्लीला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven candidates have filed their nomination papers in Dhayari by-election