esakal | गृहमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे वडगाव काशिंबग-साकोरे पुलासाठी मिळाले सात कोटी 21 लाख

बोलून बातमी शोधा

dilip walse patil

गृहमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे वडगाव काशिंबग-साकोरे पुलासाठी सात कोटी 21 लाख मंजूर

sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर : श्री क्षेत्र वडगाव काशिंबग ते साकोरे (ता.आंबेगाव) घोड नदीवर बांधल्या जाणाऱ्या पुलाच्या बांधकामासाठी सात कोटी २१ लाख रुपये निधी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले आहेत, अशी माहिती श्री क्षेत्र वडगाव काशिंबगचे माजी सरपंच श्रीराम डोके यांनी दिली. ३२ वर्षापूर्वी वडगाव काशिंबग येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा झाला. बंधाऱ्यावरून ये-जा करण्यासाठी दिलीप वळसे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पाटबंधारे खात्याने पूल बांधला होता. पण पादचारी पुलावरून साकोरे, महाळुंगे पडवळ भागातील शेतीमालाची वाहतूक करणारी मोठी वाहने ये-जा करू शकत नव्हती. त्यामुळे येथे प्रशस्त पूल व्हावा. अशी मागणी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक भरत चिखले, सामाजिक कार्यकर्ते रामदास डोके, माजी सरपंच एकनाथ गाडे व वडगाव काशिंबेग ग्रामस्थांनी केली होती.

हेही वाचा: मंचर उपजिल्हा रुग्णालयास मदतीचा 'हात'

वळसे पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुलाच्या कामाचा प्रस्ताव पाठविला होता. पूलासाठी निधी मंजुर झाल्यामुळे वडगाव काशिंबेग, साकोरे ग्रामस्थामध्ये आनंदाचे वातावरण आहे. साकोरे, नांदूर, कडेवाडी, महाळुंगे पडवळ या भागातील तरकारी व भाजीपाला उत्पादीत शेतीमाल मंचर बाजारपेठत नेण्यासाठी कळंब मार्गे १२ किलो मीटरचा प्रवास करावा लागत होता. वडगाव काशिंबग येथे घोड नदीवर पुल कार्यान्वित झाल्यानंतर पाच किलो मीटर अंतर कमी होणार आहे.-रामदास डोके, सामाजिक कार्यकर्ते साकोरे.

हेही वाचा: पुणे मुंबईकरांनाे! एसटी महामंडळाने घेतला महत्वपुर्ण निर्णय