esakal | इंदापूरकरांनो, आठ दिवसांचा शिधा जमा करा 
sakal

बोलून बातमी शोधा

lock down.

इंदापूर शहरातील वाढता कोरोना समूहसंसर्ग रोखण्यासाठी व कोरोनाचा मृत्यू दर कमी करण्यासाठी शहरात शुक्रवारपासून (ता. ११) सलग ७ दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. 

इंदापूरकरांनो, आठ दिवसांचा शिधा जमा करा 

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर (पुणे) : इंदापूर शहरातील वाढता कोरोना समूहसंसर्ग रोखण्यासाठी व कोरोनाचा मृत्यू दर कमी करण्यासाठी शहरात शुक्रवारपासून (ता. ११) सलग ७ दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी झूम अॅपवर पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, येत्या गुरुवार (ता. १०) सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखालीसर्व पक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर,  स्वयंसेवी संस्थाचालक, व्यापारी, बँक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नगराध्यक्ष यांची बैठक घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी रूपरेषा ठरवली जाईल. मात्र, ११ सप्टेंबरनंतर शहरात सात दिवस कडकडीत बंद पाळला जाईल. त्यामुळे सर्व शहरवासीयांनी आठ दिवस पुरेल एवढे शिधा, भाजीपाला, फळे, औषध घेऊन ठेवावीत. 

आता लग्नाची सीडीही पोलिस ठाण्यात द्यावी लागणार

गारटकर यांनी सांगितले की, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सुसज्ज कोविड सेंटर इंदापूर उपजिल्हा रुग्णालय, निमगाव केतकी, भिगवण येथे सुरू केले आहे. मात्र, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आपणास इंजेक्शन,औषधे उपलब्ध करणे गरजेचे आहे. सर्व कोविड सेंटरमध्ये रुग्णांना गरम पाणी व वाफ घेण्याची सोय उपलब्ध करणे, जनरेटर व सुसज्ज रुग्णवाहिका सुविधा देणे, चहा, डबा किंवा औषधे पोहोचवण्यासाठी स्वयंसेवक उपलब्ध करणे गरजेचे आहे. इंदापूर रोटरी क्लबने 100 ऑक्सिजनयुक्त बेड देण्याचे कबूल केले आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. युवा पिढी व कोरोनातून बऱ्या झालेल्यांनी रक्तदान करण्यास पुढे येणे गरजेचे आहे. आमचे सरकार आहे, मात्र सर्व सोंग करता येत नाही. त्यामुळे कोरोनाचा मृत्युदर कमी करून या आजारावर मात करण्यासाठी सर्वांनी मतभेद बाजूस ठेवून समर्पणवृत्तीने काम करणे गरजेचे आहे. 

पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा दोन लाख होणार क्राॅस

कोरोना ही जागतिक महामारी असल्याने सर्व राजकीय जोडे बाजूस ठेवून माणुसकी धर्म केंद्रबिंदू मानला पाहिजे. वाढता मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे. कोरोनावर जोपर्यंत रामबाण औषध किंवा लस निघत नाही, तोपर्यंत आपण सर्वांनी स्वतःचा बचाव करणे गरजेचे आहे. राजकारण बाजूस ठेवून आपली माणसं प्रथम वाचविणे गरजेचे आहे. 
 -प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, पुणे
 
 

loading image