esakal | BIG BREAKING: बारामती, इंदापूर, दौंडसह सात तालुक्यांसाठी आनंदाची बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

agi.jpg

-बारामती, इंदापूर, दौंडसह सात तालुके पाणी टंचाईमुक्त

-पुणे जिल्ह्यात २०० टॅकर घटले : अवघे ३८ टॅंकर सुरू

BIG BREAKING: बारामती, इंदापूर, दौंडसह सात तालुक्यांसाठी आनंदाची बातमी

sakal_logo
By
गजेंद्र बडे

पुणे : पुणे जिल्हा यंदा तीव्र पाणीटंचाईच्या गडद छायेतून पुर्णपणे बाहेर आला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत  कायम दुष्काळी आणि टंचाईग्रस्त समजले जाणाऱे बारामती, इंदापूर,  दौंडसह सात तालुके यंदा टॅकरमुक्त झाले आहेत. यामुळे टॅकरवाले अशी ओळख असलेले तालुके आता टॅकरमुक्त झाले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सद्यस्थितीत जिल्ह्यातील केवळ सहा तालुक्यातील केवळ २८ गावे आणि १३३ वाड्या-वस्त्यांना ३८ टॅकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षी आजअखेरपर्यंत २५० टॅकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा टॅकरच्या संख्येत  २०० ने घट झाली आहे.

- आता महिलाही मशिदीत नमाज अदा करणार? सुप्रीम कोर्टाने केंद्रासह वक्फबोर्डाला पाठवली नोटीस

यंदा आतापर्यंत टॅकरमुक्त असलेल्या तालुक्यांमध्ये बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, मावळ, मुळशी आणि वेल्हे या सात तालुक्यांचा तर टॅकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असलेल्यांमध्ये आंबेगाव, जुन्नर, हवेली, खेड, भोर आणि शिरूर या सहा तालुक्यांचा समावेश आहे. 

सध्या आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक १३ टॅकर सुरू आहेत. त्यानंतर जुन्नरमध्ये  दहा, हवेली व खेड प्रत्येकी सहा, भोर दोन अाणि शिरूर तालुक्यात एक टँकर सुरु आहेत. 

पुणे जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणासाठी २५ कोटी १२ लाख ८८ हजार रुपयांचा पाणी टंचाई निवारण कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. 

- मोठी बातमी : 'या' भागातील शाळा सुरु होणार? ऑनलाइन अॅडमिशनला सुरुवात!

टंचाई निवारणासाठी प्रमुख उपाययोजना 

- नवीन विंधन विहिरी घेणे.

- प्रस्तावित पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करणे.

- विंधन विहिरींची दुरुस्ती करणे.

- तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे.

- टॅकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.

- विहिरींचे अधिग्रहण करणे.

- विहीरींची खोली वाढवणे, गाळ काढणे. 

उपाययोजनांची संक्षिप्त माहिती

- उपाययोजनांची एकूण प्रस्तावित कामे : १६३२.

- संभाव्य टंचाई ची गावे : ४४९.

- संभाव्य टंचाईच्या एकूण वाड्या-वस्त्या  : १७२०

- जिल्ह्यातील सध्या तहानलेली लोकसंख्या  : ४४ हजार ३५९.


- तहानलेली गावे, वाड्या-वस्त्या  : २८ गावे, १३३ वाड्या-वस्त्या.

- सध्या सुरू असलेले एकूण टॅकर  : २८.

- खासगी विहिरींचे अधिग्रहण  : २२ विहीरी, ४ कुपनलिका.

-  टॅकरच्या नियोजित खेपांची संख्या  : १०२.

- प्रत्यक्षात होत असलेल्या एकूण खेपा  : ९५.


पुणे जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या तीव्रतेत गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोठी  घट झाली आहे. यंदा आतापर्यंत दुष्काळी समजल्या जाणाऱ्या तालुक्यातही टॅकर सुरू झालेला नाही. यंदा टॅकरच्या संख्येत सुमारे २०० ने घट झाली आहे. -सुरेंद्रकुमार कदम, 
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, 
जिल्हा परिषद, पुणे.

- विद्यार्थ्यांनो, परीक्षा रद्द केल्यास 'कोरोना बॅच'चा शिक्का मारला जाणार

loading image