पुणेकरांनो, दहा महिन्यानंतर शनिवारवाडा पर्यटकांसाठी खुला; ऐतिहासिक वास्तूंकडे वळाले पर्यटक

Shaniwar_Wada
Shaniwar_Wada
Updated on

पुणे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंद केलेल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले पर्यटनासाठी खुले करण्यात आल्यानंतर शनिवारवाड्यासह विविध ऐतिहासिक वास्तूंना भेटी देण्यासाठी पर्यटकांची लगबग सुरू झाली आहे. बरेच दिवस घरात अडकून पडलेल्या पर्यटकांमध्ये उत्साह दिसून आला. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये पर्यटनासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे गेल्या दहा महिन्यांपासून बहुतांश पर्यटनस्थळे बंद होती. दरम्यान, राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवारी जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू आणि किल्ले पर्यटनासाठी खुले करण्यास मान्यता दिली. त्यानंतर पहिल्याच दिवशी बुधवारी शहरातील शनिवारवाड्यासह काही ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी पर्यटकांनी हजेरी लावल्याचे दिसून आले. तर, काही ठिकाणी पर्यटकांची फारशी गर्दी नव्हती. 

पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना शारीरिक अंतर राखणे, मास्कचा वापर आणि हात स्वच्छ धुणे बंधनकारक करण्यात आले आहे. काही ठिकाणी पर्यटकांकडून या नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे दिसून आले. 

कोरोनामुळे जास्त दूर अंतरावरील पर्यटनस्थळी प्रवास करणे शक्‍य होणार नाही. शिवाय, बरेच दिवस "वर्क फ्रॉम होम'मुळे घरात बसूनही कंटाळा आला आहे. आता जिल्ह्यातच जवळपास असलेल्या पर्यटनस्थळांवर खुलेपणाने फिरता येईल. आम्ही नियमांचे पालन करूनच पर्यटनाचा आनंद घेणार आहोत. 
- सुरेंद्र जनबंधू, पर्यटक 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Health officials and Ruby Hall Clinic representatives discuss expanding cardiac and cancer treatment under government health schemes in Maharashtra.
Around 400 youth participated in awareness rallies across 10 Lighthouse skill development centres in Pimpri-Chinchwad on Independence Day.
Tourists flocked to Naneghat in Junnar on August 15 to enjoy the Independence Day holiday and the monsoon season.
Aadhaar authentication issue
Marathi News Esakal
www.esakal.com