शरद पवारांनी दगडूशेठ मंदिरात बाहेरूनच घेतलं दर्शन, सांगितलं 'हे' कारण

sharad pawar dagdusheth ganpati visit return from temple due to eating non vegetarian food
sharad pawar dagdusheth ganpati visit return from temple due to eating non vegetarian food Sakal

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे मागील काही दिवसापासून सतत चर्चेत आहेत. यादरम्यान आज शरद पवारांनी आज पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्याची पाहणी केली, तसेच दगडूशेठ गणपतीचे दर्शन देखील घेतले. मात्र पवारांनी भिडे वाड्याच्या पाहणीनंतर शरद पवारांना नॉनव्हेज खाल्ल्याने मंदराच्या बाहेरुनच दर्शन घेतलं. (sharad pawar dagdusheth ganpati visit)

काही दिवसांपूर्वी ब्राह्मण संघटने सोबत भेट घेतली होती. त्यानंतर आता पवारांनी पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आहे. शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी स्वत: ही इच्छा बोलून दाखवली होती. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे शरद पवारांना जातीयवादी संबोधलं होतं, तसंच ते नास्तिक असल्याची टीकाही त्यांनी केली होती. त्यानंतर काही दिवसांतच ब्राह्मण संघटनांची भेट घेतली आणि आता पुण्यात गणपतीच्या दर्शन देखील घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात होते, या भेटीदरम्यान त्यांनी आज दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसराला भेट दिली. मंदिरात न जाता त्यांनी बाहेरुनच दर्शन घेतलं. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान पवार हे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जाणार होते. मात्र आ नॉनव्हेज खाल्लं असल्याने मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी न जाता बाहेरुन दर्शन घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

sharad pawar dagdusheth ganpati visit return from temple due to eating non vegetarian food
सुप्रिया सुळेंविरोधातील 'ते' विधान चंद्रकांत पाटलांना भोवलं; महिला आयोगाची नोटीस

याआधी राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर टीका करताना ते नास्तिक आहेत, धर्म मानत नाहीत असं म्हटलं होतं. त्यावर उत्तर देताना आपण धार्मिक आहोत पण ती आपली खासगी गोष्ट असून त्याचं सार्वजिनकरित्या प्रदर्शन करत नसल्याचे शरद पवार म्हणाले होते.

sharad pawar dagdusheth ganpati visit return from temple due to eating non vegetarian food
आर्यन खानच्या क्लीनचीटनंतर नवाब मालिकांचे ट्वीट, म्हणाले..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com