

बारामती, ता. ३ : ‘‘सध्याच्या टंचाईच्या परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवून लोकांना मदत करण्याचा राज्य सरकारचा दृष्टिकोन स्वागतार्ह आहे. चारा, पाणी आणि महसूल माफी यांसारख्या मागण्या शेतकऱ्यांकडून होत आहेत. सार्वजनिक जीवनात काम करणारे अनेक लोक मदतीसाठी पुढे येत आहेत. सरकारने त्यांना सहकार्य करून शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बळीराजाला सर्वतोपरी मदत करावी,’’ अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.
बारामतीत शनिवारी (ता. ३) माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी दुष्काळाबाबत संवेदनशीलपणे मदतीची अपेक्षा व्यक्त केली. तसेच, ते म्हणाले, ‘‘उजनी धरणाशी संबंधित कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राच्या प्रकल्पाबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेणार आहे. हा प्रकल्प नेमका काय आहे याची माहिती मला नाही, मी माहिती घेऊनच याबाबत बोलेन.’’
शरद पवार म्हणाले...
- वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर मंत्री समितीत आणखी एका प्रतिनिधीचा समावेश करण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, समितीने त्याची आवश्यकता नसल्याचे सरकारला कळविले आहे.
- काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारीबाबत आपल्याला माहिती नाही. शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील अन्य नेत्यांशी चर्चा करीत आहेत.
- निवडणूक आयुक्तांविषयी जनतेमध्ये नाराजी असून, त्याची नोंद केंद्र सरकारने घ्यावी. मुंबईतील आंदोलनासह अन्य ठिकाणच्या आंदोलनांचीही सरकारने दखल घ्यावी.
- फ्लाय दुबईच्या विमानात भारतीय वैमानिकाने दाखविलेल्या धाडसामुळे मोठी मनुष्यहानी टळली. या घटनेमागे कोण आहे, याचा तपास भारत सरकार आणि संबंधित यंत्रणा निश्चितपणे करतील, मात्र घडलेली घटना चिंताजनक आहे, हे निश्चित.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आंदोलनातील मागण्यांची सरकारने दखल घ्यावी.
- ठाकरे बंधूंच्या मुंबईतील आंदोलनाला पाठिंबा आहे. आपल्या पक्षाचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.