शरद पवारांसाठी 22 वर्षांपासून 'तो' येतोय 300 किमी सायकल चालवत

Abdul Khadke
Abdul Khadke

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (12 डिसेंबर) त्यांचा एक चाहता तब्बल 300 किलोमीटर सायकल चालवत निलंगाहून काटेवाडी या त्यांच्या गावी दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांच्या या निष्ठेला सलाम केला आहे.

लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील शरद पवार यांचा एक अनोखा चाहता गेल्या 22 वर्षापासून निलंगा ते काटेवाडी असा सायकलने प्रवास करत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येतो. अब्दुल गणी खडके असे त्यांचे नाव असून, त्यांचे वय 62 आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून खडके निलंगा ते काटेवाडी असा सायकलवरून प्रवास केल्याची माहिती देण्यात आली आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काटेवाडीत दरवर्षी कार्यक्रम होतो. निलंगा येथील त्यांचे चाहते खडके हे 1998 पासून आजपर्यंत आवर्जून उपस्थित राहतात. यावर्षीही तो काटेवाडीत आला आहे. यंदा तर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आली असून, शरद पवारांचा यात मोलाचा वाटा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com