esakal | खुद्द शरद पवार घेणार तीन मंत्र्यांची बैठक...या कामासाठी आहेत आग्रही
sakal

बोलून बातमी शोधा

sharad-pawar

कोरोनाच्या संकटानंतर या संदर्भात ही महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती महाऑरगॕनिक ॲन्ड रेसिड्यूफ्री फार्मर्स असोशिएशनचे (मोर्फा) अध्यक्ष अंकुश पडवळे व सचिव प्रल्हाद वरे यांनी  दिली.

खुद्द शरद पवार घेणार तीन मंत्र्यांची बैठक...या कामासाठी आहेत आग्रही

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : राज्यात सेंद्रिय व विषमुक्त शेती विकसीत होण्यासाठी राज्याच्या कृषी, सहकार व पणनमंत्र्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेण्याची ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. कोरोनाच्या संकटानंतर या संदर्भात ही महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती महाऑरगॕनिक ॲन्ड रेसिड्यूफ्री फार्मर्स असोशिएशनचे (मोर्फा) अध्यक्ष अंकुश पडवळे व सचिव प्रल्हाद वरे यांनी  दिली.

फी कपातीसाठी मेल भेजो आंदोलन
    
बारामती येथे काल  शरद पवार यांच्या निवासस्थानी सेंद्रिय व विषमुक्त शेतीबाबत बैठक आयोजित केली गेली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी हा निर्णय घेतला. या बैठकीस  सतीश चव्हाण,  अमरसिंह पंडित, सदाशिव सातव,  अंकुश पडवळे,  प्रल्हाद वरे,  अमरजित जगताप, विजय तावरे, रोहित अहिवळे आदी या बैठकीस उपस्थित होते.

कोरोना मृतांवरील अंत्यसंस्काराचे बील कोण देणार

राज्यात सेंद्रिय व विषमुक्त शेतीला मोठा वाव असून, त्यादृष्टीने राज्य सरकारचे धोरण बनावे, सेंद्रिय, विषमुक्त शेती मालाला बाजारपेठ मिळावी, याबाबत राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, यासह इतरही मागण्यांबाबतचे सविस्तर सादरीकरण बैठकीत अंकुश पडवळे यांनी केले. सेंद्रिय व विषमुक्त उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी कृषी, सहकार व पणन विभागाची महत्त्वाची भूमिका असून, सेंद्रिय व विषमुक्त शेतीच्या विकासात तीनही विभागाची मदत घेऊन सेंद्रिय शेतीचे नवीन धोरण बनविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. निर्यातक्षम भाजीपाला व फळांचे क्लस्टर राज्य सरकारने बनवून शेतकरी कंपन्यांना लवकर मदत मिळणे गरजेचे असल्याचे प्रल्हाद वरे यांनी सांगितले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सेंद्रिय व विषमुक्त तांत्रिक दृष्टीने परिपूर्ण शेती अनेक शेतकरी राज्यात करित आहेत, पण त्यांना त्याचे मार्केटिंग जमत नाही. ग्राहकांमध्ये अशा उत्पादनाबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी शेतकरी व ग्राहक यांच्यात दुआ साधण्याचे काम राज्य सरकारने करावे. 
 - प्रल्हाद वरे, बारामती