नाना पाटेकर यांच्याकडून शरद पवारांचे तोंडभरून कौतुक; पाहा काय म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

नाना पाटेकर म्हणाले, ''शरद पवार यांनी गेल्या ५० वर्षात राजकारणात चंद्रगुप्त तयार केला नाही. पण त्यानंतर अस लक्षात आलं की, शरद पवार हेच चंद्रगुप्त ही आणि चाणक्य आहेत.''

पुणे : नाना पाटेकर यांनी पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

यावेळी बोलताना नाना पाटेकर म्हणाले, ''शरद पवार यांनी गेल्या ५० वर्षात राजकारणात चंद्रगुप्त तयार केला नाही. पण त्यानंतर अस लक्षात आलं की, शरद पवार हेच चंद्रगुप्त ही आणि चाणक्य आहेत. शरद पवार हे उभारी घेणारे नेते आहेत, त्यांनी कॅन्सर सारख्या आजाराला परत पाठवलं माणसाच काय.''

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाटेकर पुढे म्हणाले की, शरद पवार हे माझे हिरो होते. शरद पवार हे माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे आहेत. हा माणूस नक्कीच महाराष्ट्रासाठी काही तरी करेल अस नेहमी वाटायचं. त्यामुळे पक्ष अस काही नाही. शरद पवार यांना खासगीत बोललो होतो. की, शरदराव तुम्ही राजकारणातील चाणक्य आहात. हुशार आहात, राजकारण कस करावं हे तुम्हाला माहित आहे. एकच दुर्दैव आहे की, गेल्या ५० वर्षात एक ही चंद्रगुप्त तयार नाही केला. पण, नंतर अस लक्षात आलं….अरे चंद्रगुप्त ही तेच आहेत आणि चाणक्य ही तेच आहेत अस नाना म्हणाले.

- शेखर गायकवाड पुण्याचे नवे महापालिका आयुक्त; पदभार स्वीकारला

पुढे ते म्हणाले, शरद पवार हे उभारी घेणारे नेते आहेत. त्यांनी कॅन्सर सारख्या रोगाला परत पाठवलं. माणसांची काय, अजित पवार हा माणूस आवडतो असे नाना म्हणाले. दरम्यान, दंगलीच्या वेळी सगळ्यात जास्त हिंसक कोण होत असेल तर तो सामान्य माणूस होतो. आतमधून तुंबलेला असतो. तो व्यक्त कधी झालेला नसतो. व्यक्त न होणे हा गुन्हा आहे. सामान्य नागरिक ऐकतो, सहन करतो, प्रश्न विचारत नाहीत. राजकारण्यांना प्रश्न विचारायला पाहिजेत. आपण मत देतो, मग प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. पाच वर्षांनी एकदा मत मिळत. मग, त्याचे धिंदोडे का काढता? का त्याची गाढवावर बसून का धिंड काढता? आमचं मत आहे तुम्ही कशावर बसवलं आहे. पण सामान्य नागरिक गप्प बसतो. याचा मला खूप त्रास होतो असे नाना म्हणाले.

- पुणे : सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्याची मागणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad pawar politics chanakya chandragupta nana patekar