खुद्द शरद पवारच उतरले पुण्याच्या मैदानात...

ज्ञानेश सावंत
Friday, 4 September 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीतील शानदार कार्यक्रमात उघडलेले आणि प्रत्यक्षात उपचारांत "फेल' ठरलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरच्या कामकाजावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त केली.

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीतील शानदार कार्यक्रमात उघडलेले आणि प्रत्यक्षात उपचारांत "फेल' ठरलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरच्या कामकाजावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. पुण्यातील बिघडलेल्या स्थितीला नेमके कोणते घटक जबाबदार आहेत ? जम्बोचा उपयोग काय ? लोकांना दिलासा मिळतो आहे का ? यावरून पवार यांनी स्थानिक प्रशासनाची खरडपट्टी केली; दुसरीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांपाठोपाठ राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी पवार यांनी चर्चा केली.

पुण्यातील जम्बो व्हेंटिलेटरवर; ‘लाइफलाइन’ ला ‘पीएमआरडीए’ची नोटीस

यानिमित्ताने पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी कठोर उपाय आखण्यासाठी पवार यांनी पुढाकार घेतला आहे. 
कोरोनाला लगाम घालण्याच्या उद्देशाने राज्य सरकारच्या यंत्रणांसह महापालिका उपाय करीत आहेत. तरीही गेल्या काही दिवसांत कोरोनाचा आवाका वाढून रुग्णांचे हाल होत आहेत. तेवढ्याच शहरातील रुग्ण संख्येने लाखाचा आकडा पार केल्याने चिंता वाढली आहे. त्याचवेळी गरीब आणि गरजू रुग्णांवरील उपचारासाठी उभारलेल्या जम्बो कोविड केअर सेंटर अकार्यक्षम असल्याचे उघड झाले आहे. या साऱ्या बाबींवरून गेल्या चार-पाच दिवसांपासून प्रचंड गोंधळ सुरू आहे. त्याची दाखल घेत पवार यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली.

पुण्यातील रुग्णांच्या नातेवाइकांनी घेतला धसका 

जुन्या-नव्या उपायांवर फारशी चर्चा न करता पुण्यात नेमके काय चालले आहे ? सध्याच्या परिस्थितीवर कोणाचे नियंत्रण आहे ? खरोखरीच परिस्थिती आटोक्‍यात आणण्यात प्रयत्न होत आहेत का, हे पवार यांनी विचारले. गंभीर बाब म्हणजे, कोरोनाच्या वाढत्या संसर्गापुढे हतबल झालेल्या प्रशासकीय यंत्रणांनी मात्र नेहमीच उत्तरे पवार यांनी दिली. नागरिकांची तपासणी वाढविली आहे. पॉझिटिव्ह लोकांच्या सपंर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचीही तपासणी केली जात आहे. रुग्णांना वेळेत, तेही नेमके उपचार मिळावेत, याकरिता जम्बो आणि अन्य यंत्रणा उभारल्या आहेत. ज्यामुळे रुग्णांना विलग करण्यापासून अत्यवस्थ रुग्णांना उपचार मिळत आहेत, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जुन्या-जाणत्या नेत्यांशी चर्चा करीत, पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर उतरून लोकांना मदत करावी, अशा सूचना पवार यांनी केल्या. या बैठकीला खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, अंकुश काकडे यांच्यासह महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ उपस्थितीत होत्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

नेमक्‍या कोणत्या उपाययोजना लोकांना धीर द्या, हेही पवारांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्याचवेळी महापालिका आणि प्रशासकीय यंत्रणेतील गोंधळाबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पवार यांच्याकडे तक्रारी केल्या. एवढ्यांवरच न थांबता पवार पुण्यात शनिवारी (ता.5) चार बैठका घेणार आहेत. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे उपस्थितीत राहणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar's discussion with Pune Divisional Commissioner Saurabh Rao