Sheikh Salahuddin Dargah: पुण्यातील शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याचा वाद काय? मध्यरात्री मुस्लिम बांधव रस्त्यावर का एकवटले, नेमकं काय घडलं?

Sheikh Salahuddin Dargah: पुण्यातील हजरत ख्वाजा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याचा वाद पुन्हा समोर आला आहे. दर्ग्यावर कारवाई होणार या अफवेनं काल मध्यरात्री शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
Sheikh Salahuddin Dargah
Sheikh Salahuddin Dargahesakal

Sheikh Salahuddin Dargah: पुण्यातील हजरत ख्वाजा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याचा वाद पुन्हा समोर आला आहे. दर्ग्यावर कारवाई होणार या अफवेनं काल मध्यरात्री शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. दर्गा परिसरात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात जमले होते. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. आज पोलिस आयुक्तालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

कसब्यातील हजरत ख्वाजा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्यावर बांधकामावर कारवाई करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काल (शनिवार) मध्यरात्री या भागात मोठ्या प्रमाणात जमाव एकत्रित आला. दरम्यान, या भागात कोणतीही कारवाई होणार नसून, परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

शहरातील कसबा पेठ परिसरात हजरत ख्वाजा शेख सल्लाहुद्दीन परिसरातील बांधकामावरून न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. अनधिकृत बांधकामावर शनिवारी कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा आज सुरू होती. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने या परिसरात एकत्रित आले. त्यानंतर पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल आणि पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला.

या संदर्भात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या या ठिकाणी कोणतीही कारवाई होणार नाही. तसेच, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या संदर्भात फरासखाना पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि समाजातील पदाधिकाऱ्यांची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Sheikh Salahuddin Dargah
Maldives India Controversy: "भारताच्या हेलिकॉप्टर अन् क्रू'वर आमचे नियंत्रण"; चीनने भडकावल्यानंतर मालदीवचा अहंकार वाढला

नेमका वाद काय?

गेल्या अनेक वर्षापासून पुण्येश्वर आणि हजरत ख्वाजा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याचा वाद निर्माण झाला आहे. काल महाशिवरात्री निमित्त या परिसरात तणावर निर्माण झाला होता. दर्ग्याला लागूनच पुण्येश्वराचं मंदिर आहे. दर्ग्यावर कारवाई होणार, असे सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायपर झाले होते. मध्यरात्री पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दर्गास्थळी भेट दिली. आता देखील पोलिसांचा फौजफाटा दर्ग्याजवळ तैणात करण्यात आला आहे.

आता पुण्यात मंदिर-दर्गाचा वाद अधिकच गडद होत चालला आहे. पुण्यातील भुवनेश्वर मंदिराच्या जमिनीवर दर्गा बांधल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी केला होता. अजय शिंदे यांनी दावा केला आहे की, त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत, ज्यावरून मंदिराच्या जमिनीवर दर्गा बांधल्याचे सिद्ध होते.

Sheikh Salahuddin Dargah
Gaza Air Drop: गाझामधील दुर्दैवी घटना, हवेत पॅराशूट न उघडल्याने 5 जणांचा मृत्यू; पाहा व्हिडिओ

नेमकं दावा काय?

हजरत ख्वाजा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याच्या ठिकाणी पुण्येश्वराचं मंदिर होतं, असा दावा मनसे नेते अजय शिंदे यांनी केला आहे. अल्लाउद्दीन खिलजीचा बडा अरब नावाचा एक सरदार पुण्यावर चाल करुन आला होता. त्यावेळी त्याने भगवान शंकराची पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही मंदिरं उध्वस्त केली. एक मंदिर शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आहे. तर दुसरं मंदिर लालमहालाच्या पलीकडे कुंभार वेशिजवळ आहे. तिथे आज छोटा शेख दर्गा आहे. या सगळ्या मंदिरांवर मशिदी बनवण्यात आल्या असल्याचा दावा अजय शिंदे यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com