शिक्षणमहर्षी तात्यासाहेब गुंजाळ यांचे निधन

Shikshan Maharshi Tatyasaheb Gunjal passed away
Shikshan Maharshi Tatyasaheb Gunjal passed away

नारायणगांव : जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणमहर्षी तात्यासाहेब रखमाजी गुंजाळ(वय ७९) यांचे पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवार (ता.१८) रात्री निधन झाले.

जयहिंद एज्युकेशन इंस्टिट्यूटचे सचिव विजय, उद्योजक जितेंद्र, धर्मेंद्र, संजय हे त्यांचे पुत्र आहेत. तात्यासाहेब यांनी शेती, शिक्षण, सहकार, उद्योग क्षेत्रात भरीव काम केले. तात्यासाहेब यांचा प्राथमिक शिक्षक ते यशस्वी उद्योजक, शिक्षणमहर्षी, आदर्श शेतकरी, निस्पृह राजकारणी असा प्रवास थक्क करणारा आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जुन्नर तालुक्यात कॉफी लागडीचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला. कुरण येथील माळरानावर जयहिंद एज्युकेशन इंस्टिट्यूटची स्थापना केली. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, तांत्रिक शिक्षण देण्याची व्यवस्था केली. शेतकरी कुटुंबातील शेकडो गरीब व हुशार विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत शिक्षण दिले. लाला बँकेच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. लाला बँकेचे अध्यक्ष, संचालक म्हणून काम पाहिले. नारायणगाव येथे जयहिंद पतसंस्था, जयहिंद उद्योग समुहाची स्थापना केली.

पुणे जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. माजी खासदार संभाजीराव काकडे, किसनराव बाणखेले यांचे ते समर्थक होते. जनता दलाच्यावतीने सन १९९० साली त्यांनी जुन्नर विधानसभेची निवडणूक लढवली होती. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले.

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता

जुन्नर तालुक्याच्या राजकारणावर त्यांची पकड होती. महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवनेरी भूषण पुरस्काराने व ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते  शरदचंद्र गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

आमदार अतुल बेनके : तात्यासाहेब हे समाजवादी विचारसरणीचे होते. राजकारणात अनेक चढ उतार आले मात्र ते जनता दल पक्षाशी एकनिष्ठ राहिले. जुन्नर तालुक्याच्या शेती, शिक्षण, सहकार, उद्योग क्षेत्रातील प्रगतीत त्यांचे मोठे योगदान होते.त्यांच्या निधनामूळे निस्पृह अष्टपैलू व्यक्तीमत्व हरपले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com