डॉ. राजेश टोपे यांना शिंदे स्मृती पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

‘राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील आणि कृषीतज्ज्ञ विलास शिंदे यांना यंदाचा स्व. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे, ’’अशी माहिती महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर आणि उद्धव कानडे यांनी दिली.

अनुराधा पाटील, विलास शिंदे यांचाही समावेश
पुणे - ‘राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील आणि कृषीतज्ज्ञ विलास शिंदे यांना यंदाचा स्व. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे, ’’अशी माहिती महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर आणि उद्धव कानडे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी साडेपाच वाजता हा समारंभ होणार आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. 

पोलिसाच्या अंगावर गाडी घातली अन् ठोकली धूम; येरवड्यातील प्रकार

डॉ. टोपे यांना आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी, ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी आणि कृषीतज्ज्ञ आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसरचे विलास शिंदे यांना कृषी क्षेत्रातील कार्यासाठी यंदाचा हा पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रत्येकी रुपये पाच हजार, महात्मा फुले सत्यशोधकीय फेटा आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

'केंद्रातील मंत्र्यांनी भालेरावांच्या कविता ऐकाव्यात'; शिक्षणमंत्र्यांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shinde Smruti Award Goes to Dr Rajesh Tope