शिंगव्यातील 'त्या' मुलाचा मृत्यू गोबर गॅस टाकीत पडून

शिंगवे ता.आंबेगाव येथे सकाळी अंगणात खेळत असताना अचानक गायब झालेल्या कृष्णा गाढवे चा मृतदेह घराजवळील गोबर गॅस व स्वच्छ ता गृहाच्या टाकीमध्ये आढळून आला
शिंगव्यातील 'त्या' मुलाचा मृत्यू गोबर गॅस टाकीत पडून
शिंगव्यातील 'त्या' मुलाचा मृत्यू गोबर गॅस टाकीत पडून sakal media

निरगुडसर : शिंगवे ता.आंबेगाव येथे सकाळी अंगणात खेळत असताना अचानक गायब झालेल्या कृष्णा गाढवे चा मृतदेह घराजवळील गोबर गॅस व स्वच्छ ता गृहाच्या टाकीमध्ये आढळून आला. त्यामुळे काल दिवसभर बिबट्याच्या हल्ल्यातून मृत्यू झाल्याच्या संशयाला आज सकाळी पूर्ण विराम मिळाला. कृष्णाचा मृतदेह मिळाल्यानंतर परिसरात शोककळा पसरली.

शिंगव्यातील 'त्या' मुलाचा मृत्यू गोबर गॅस टाकीत पडून
''आरोपांवर मलिकांनी स्वतःच कबुली दिलीय, नवाबी भाडेकरू मुंबईत सापडणार नाही''

शिंगवे गावाच्या उत्तरेला गाढवे वस्ती आहे तेथे राहणाऱ्या विलास कुंडलिक गाढवे यांचा दोन वर्षाचा मुलगा कृष्णा ओट्यावर खेळत होता त्यानंतर तो साडेनऊ वाजेच्या सुमारास घराच्या पूर्व दिशेला टाकी जवळ गेला. त्यानंतर कृष्णा दिसेनासा झाला म्हणून त्याची आई सविता यांनी इतर घरांमध्ये शोध घेतला. परंतु, कृष्णा सापडला नाही त्यानंतर कृष्णाला बिबट्याने उचलून नेल्याचा संशय वाढला कारण की गेल्या अनेक दिवसापासून वस्तीवर बिबट्याचा वावर असून, अनेक वेळेला नागरीकांनी दोन दोन तीन तीन बिबटे फिरताना पाहिले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते त्यामुळे स्थानिक नागरिकांसह कुटुंबीयांनी बिबट्याने च मुलाला उचलून नेल्याचा संशय व्यक्त केला.

शिंगव्यातील 'त्या' मुलाचा मृत्यू गोबर गॅस टाकीत पडून
स्वतःवरील आरोप दाबण्यासाठी फडणवीसांनी मलिकांचं प्रकरण काढलं - आंबेडकर

सोमवारी दिवसभर घराजवळ वनविभाग व स्थानिक नागरिकांनी उसाच्या शेतात शोध घेतल्यानंतरही कृष्णा काही सापडला नाही. अखेर आज सकाळी गाढवे कुटुंबीय मुलाचा शोध घेत असताना सकाळी आठ वाजता घराच्या बाजूला असलेल्या गोबर गॅस व स्वच्छ ता गृहाच्या टाकीत लाल कलरचे काहीतरी तरंगलेले दिसले. त्यावेळी कुटुंबियांनी पाहिले असता कृष्णा गाढवे या लहानग्याचा मृतदेह आढळून आला. मुलगा खेळता-खेळता गोबर गॅसच्या टाकीत पडला असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घडलेल्या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलाचा मृतदेह शविच्छेदनासाठी मंच र उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला असून, पुढील तपास मंचर पोलिस करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com