
तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण,सांस्कृतिक,क्रिडा समिती आयोजित संयुक्त शिवजयंती भीमजयंती महोत्सव रथयात्रेला बुधवारी (ता.१९) मोठया थाटात आणि ढोलताशांच्या गजरात सुरुवात झाली.
शिवनेरीची ‘शिवसुमन’ आता रायगडावर
यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, अंजलीराजे दाभाडे, मुख्याधिकारी दिपक झिंजाड, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक वीरेंद्रकुमार टोपो, पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, शिक्षण, क्रिडा समितीचे सभापती तथा महोत्सवाचे संयोजक गणेश खांडगे, उदयोजक किशोर आवारे तसेच नगरसेवक, नगरसेविका आणि मान्यवरांच्या हस्ते एसटी बसस्थानक परिसरात साडेआठला महापुजा होऊन रथयात्रेला सुरुवात झाली. तळेगाव शहरातील जवळपास पंचवीस शाळांचे सजवलेले स्वतंत्र रथ ढोलताशांच्या गजरात रथयात्रेत सामील झाले.
Video : शिवराई नाणं आजही खणखणीत
विदयार्थांनी पारंपारिक वेशभुषा करत हातात भगवे निळे झेंडे घेऊन जय भवानी जय शिवराय जय भीमराय अशा घोषणा देत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. महापुरषांचे तसेच ऐतिहासिक घटनांचे जीवंत देखावे रथांवर सादर केले. रथयात्रेत हजारो विद्यार्थी, नागरिक सहभागी झाल्याने जवळपास दिड किलोमीटर अशी भव्यदिव्य अभुतपूर्व रथयात्रा तळेगावकरांनी पहिल्यांदाच अनुभवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.