Video : ....म्हणून शिवसैनिकांनी आधिकाऱ्यांपुढे फेकला कचरा

समाधान काटे
सोमवार, 29 जून 2020

पावासाळा सुरू होऊन देखील नाले सफाई झालेली नाही. नालेसफाईचे काम संथ गतीने सुरू आहे. वारंवार तक्रारी करुन देखील अधिकारी जुमानत नाहीत. ठेकेदार अर्धवट काम करतात.

गोखलेनगर (पुणे) : पावासाळा सुरू होऊन देखील नाले सफाई झालेली नाही. नालेसफाईचे काम संथ गतीने सुरू आहे. वारंवार तक्रारी करुन देखील अधिकारी जुमानत नाहीत. ठेकेदार अर्धवट काम करतात. पवसाळ्यात पाणी साठून नागरिकांच्या घरामध्ये शिरते. कोरोनाचे कारण सांगून नालेसफाईत दिरंगाई होत असल्याने शिवाजीनगर शिवसेना विभाग प्रमुख प्रविण डोंगरे व शिवससैनिकांनी नाल्यातील कचरा गोळा करून शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयत आणून आंदोलन केले. आधिऱ्यांची बदली करावी,काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराचे बील काढावे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

 

पुढील आठवड्यात नालेसफाई नाही झाल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल असे आंदोलन कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. यावेळी डोंगरे यांनी संबंधित ठेकेदाराची तक्रार केली असता अधिकारी व डोंगरे यांच्यात बाचाबाची झाली. शिवसैनिक आक्रमक झाले व अधिकाऱ्यांच्या पुढे कचरा ओतला. कार्यकारी अभियंता पुणे महापालिका श्रीधर येवलेकर यांच्याकडून लेखी लिहून घेतले की, पुढील सात दिवसात नाले सफाई केली जाईल. नंतरच शिवसैनिकांनी आंदोलन स्थगित केले. यावेळी प्रविण डोंगरे, उमेश वाघ, प्रकाश धामणे, सुनिल अलकुंटे, जयाताई पिल्ले, मयूर पवार, जावेद शेख़, प्रशांत डोंगरे, बालाजी ओरसे, आकाश रेणुसे, संतोष ओरसे, उपेश सोनावणे आदी उपस्थित होते.

'पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

 

"ज्या ठिकाणी नाला सफाईचे काम राहिलं आहे, तिथे पुढील सात दिवसांत सफाई केली जाईल. कंटेनमेंट झोन असल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना पोलिस जाऊन देत नाहीत. विशेष परवानगी घेतल्यामुळे पुढील चार- पाच दिवसात काम करत आहोत"
- श्रीधर येवलेकर, कार्यकारी अभियंता पुणे महापालिका.

StartupStory: सोशल डिस्टन्सिंगसाठी तरुणानं डोकं लढवलं; तुम्हीही कराल कौतुक

नागरिकांची सहमती न झाल्यास ठेकेदाराला बिल अदा करू नये. प्रशासन नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जिवाची हानी झाल्यास त्याला प्रशासन जबाब दार राहील .अधिकारी त्यांचे काम एकमेकांवर ढकलतात".
- प्रविण डोंगरे, शिवसेना विभागप्रमुख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sainiks throw garbage in front of officials