शिवरायांचे संस्कार तरुणांपर्यंत पोचावेत - सोनाली कुलकर्णी

कसबा पेठ - श्री कसबा गणपती (चौक) शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना ‘स्त्रीशक्ती’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
कसबा पेठ - श्री कसबा गणपती (चौक) शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना ‘स्त्रीशक्ती’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुणे - ‘महाराष्ट्रात महिलांवर होत असलेले अत्याचार पाहता, या राज्याला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची गरज आहे. त्यांचे संस्कार प्रत्येक तरुणापर्यंत पोचले, तर या राज्यातील प्रत्येक स्त्री सुरक्षित असेल व ‘ती’चा सन्मान केला जाईल. तसेच, त्यांच्यावर होणारे अत्याचारसुद्धा थांबतील,’’ असे मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

श्री कसबा गणपती (चौक) शिवजयंती उत्सव मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये सोनाली कुलकर्णी यांना ‘स्त्रीशक्ती’ (हिरकणी) पुरस्काराने गौरविण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. 

हा कार्यक्रम श्री कसबा गणपती मंदिरासमोर आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी अध्यक्ष महेश मोळवडे, नटरंग ॲकॅडमीचे संचालक जतीन पांडे, समितीचे विश्‍वस्त पुष्कर तुळजापूरकर, नगरसेवक योगेश समेळ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांचे वंशज रणजित नातू, विक्रमसिंह मोहिते, विनायकराव रणवरे, रवींद्र कंक, संभाजी महाराजांचे १६वे वंशज नितीन भोसले आदी उपस्थित होते.

सोनाली म्हणाल्या, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात प्रत्येक महिला सुरक्षित होती. परंतु, आज महिला असुरक्षित वातावरणात जगत आहेत. कित्येक वर्षांपासून शिवजयंती मोठ्या जल्लोषाने साजरी केली जात आहे. अशा कार्यक्रमांमुळे महाराजांचे महत्त्व आणि त्यांचे संस्कार सातत्याने प्रत्येक पिढीपर्यंत पोचत आहेत.’’ 

भोसले म्हणाले, ‘‘महाराजांच्या विचारांना व त्यांच्या संस्कारांना प्रत्येक नागरिकाने आपल्या आचरणात आणणे गरजेचे आहे. महाराजांचे कौशल्य, त्यांची विचारसरणी, याबद्दलची माहिती सर्वसामान्यांना आहे. परंतु, ते अमलात आणण्यावर भर दिला पाहिजे.’’

या वेळी कार्यक्रमामध्ये शिवचरित्रावर आधारित जिवंत देखावा सादर करण्यात आला. यामध्ये १०० कलाकारांनी सहभाग घेत महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग अभिनयाद्वारे उलगडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com