नियमांचा ‘लाभ’ घेत ‘शिवभोजन’चा आस्वाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवभोजन’ थाळी योजनेला शहरातील गरजू नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील तीन दिवसांत चारही केंद्रांमध्ये एक हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी थाळीचा आस्वाद घेतला. ‘वायसीएम’ रुग्णालय, वल्लभनगर एसटी बस स्थानकावर लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. मात्र निमसरकारी, शासकीय कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत नियमांमध्ये स्पष्टता नसल्याने त्याचाही काही ठिकाणी ‘लाभ’ घेतला जात आहे.

पिंपरी - राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवभोजन’ थाळी योजनेला शहरातील गरजू नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील तीन दिवसांत चारही केंद्रांमध्ये एक हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी थाळीचा आस्वाद घेतला. ‘वायसीएम’ रुग्णालय, वल्लभनगर एसटी बस स्थानकावर लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. मात्र निमसरकारी, शासकीय कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत नियमांमध्ये स्पष्टता नसल्याने त्याचाही काही ठिकाणी ‘लाभ’ घेतला जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य सरकारने प्रजासत्ताक दिनापासून गरीब व गरजू व्यक्तींना अवघ्या १० रुपयांमध्ये ‘शिवभोजन’ थाळी योजना सुरू केली आहे. शहरात सध्या पिंपरी-चिंचवड महापालिका उपाहारगृह, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण उपाहारगृह, वल्लभनगर एसटी स्थानक आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या उपाहारगृहामध्ये ही योजना लागू केली आहे. या केंद्रांमधून पुरवठा निरीक्षकांच्या देखरेखीखाली दररोज ५०० जणांना जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. लाभार्थ्याचे नाव, मोबाईल क्रमांक आणि फोटो सरकारच्या ‘शिवभोजन’ ॲपवर अपलोड केल्यावर त्याचे कुपन तयार होत आहे. त्यानंतर लाभार्थ्याला थाळी दिली जाते. 

पुणे : गांधी पुण्यतिथी दिवशी सीएएविरोधात अहिंसात्मक जनआंदोलन 'या विषयावर सभा

नायब तहसीलदार नागनाथ भोसले यांच्याकडे प्राधिकरण उपाहारगृह आणि वल्लभनगर एसटी स्थानक उपाहारगृह; तर नायब तहसीलदार दिनेश तावरे यांच्यावर वायसीएम आणि महापालिका उपाहारगृहाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या योजनेचा सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेण्यास मनाई केली आहे. मात्र निमशासकीय, कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत नियमांत स्पष्टता नसल्याने काही केंद्रांवर अशा कर्मचाऱ्यांनी थाळीचा आस्वाद घेतला आहे. लाभार्थ्यांकडे स्वतःचा मोबाईल नसल्यास त्याच्या परिचित व्यक्तीचा क्रमांक घेतला जात आहे. पालिका उपाहारगृह आणि ‘वायसीएम’ येथे वेळेपूर्वीच थाळीची मर्यादा संपल्याने तेथे जेवण देणे बंद करण्यात आले.

जेवणाची चव चांगली आहे. दोन दिवसांपासून मी योजनेचा लाभ घेत आहे. चपात्या थोड्या कमी वाटतात. जादा चपात्यांची सोय झाली पाहिजे. 
- नितीन मोरे, वाहनचालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivbhojan thali scheme in pimpri chinchwad