
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी आदींचे जेवणाचे हाल होऊ नयेत, म्हणून राज्य सरकारने मार्च महिन्यात शिवभोजन थाळीचे दर निम्म्याने कमी केले होते. हेच दर आणखी चार महिने कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता ३१ मार्चपर्यंत पाच रुपयांत शिवभोजन मिळणार आहे.
पुणे - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी आदींचे जेवणाचे हाल होऊ नयेत, म्हणून राज्य सरकारने मार्च महिन्यात शिवभोजन थाळीचे दर निम्म्याने कमी केले होते. हेच दर आणखी चार महिने कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता ३१ मार्चपर्यंत पाच रुपयांत शिवभोजन मिळणार आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मार्च महिन्यात लॉकडाउन केले होते. या काळात शहरात गरिबांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य शासनाने दि. ३० मार्चपासून शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांऐवजी पाच रुपये करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आतापर्यंत पाच रुपयांत हे भोजन मिळत होते.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
त्यास शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याबाबतचे आदेश नुकतेच राज्य सरकारकडून काढण्यात आले आहेत. त्यामुळे गरीब आणि गरजू व्यक्तींना याचा फायदा होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या धमक्यांना भीत नाही; काय करायचं ते करा : चंद्रकांत पाटील
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात रोज सरासरी २ हजार ९०० नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. शिवभोजन केंद्रांमध्ये दुपारी १२ ते २ या वेळेत जेवण मिळत असून ३० ग्रॅमच्या २ चपात्या, १०० ग्रॅम एक वाटी भाजी, १०० ग्रॅम १ वाटी वरण व १५० ग्रॅम भात आदींचा थाळीत समाविष्ट आहे.
Edited By - Prashant Patil