पुणे : मार्केट यार्डमधील शिवनेरी रस्ता 16 जुनपर्यंत वाहतुकीसाठी बंद

marketyard
marketyard sakal media

पुणे ः कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर मार्केटयार्ड परिसरात खरेदीसाठी होणारी गर्दी रोखण्यासाठी वाहतुकीसाठी बंद केलेला शिवनेरी रस्त्यावरील निर्बंध 16 जूनपर्यंत कायम राहणार आहेत. शेतीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही. अशी माहिती वाहतुक शाखेतर्फे देण्यात आली आहे.

marketyard
पुणे : यवतच्या कांचन व्हेज हॉटेलला भीषण आग

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर तसेच मार्केट यार्ड येथे किरकोळ खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीवर पोलिसांकडून नियंत्रण आणण्यात आले होते. त्यामुळे शिवनेरी रस्त्यावरील वखार महामंडळ चौक ते मार्केटयार्ड (उत्सव हॉटेल चौक) दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे.

marketyard
पुणे व पिंपरी-चिंचवडला काय सुरू अन् काय बंद?

दरम्यान, संचारबंदी आदेश 16 जुनपर्यंत वाढल्यामुळे किरकोळ खरेदीवरही पुन्हा नियंत्रण ठेवण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. त्यानुसार, मार्केटयार्डात किरकोळ खरेदीदारांना प्रवेश मिळणार नाही. शेतीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना केळी बाजारातील प्रवेशद्वारातून प्रवेश मिळेल. तशेतीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांनी मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडून उजवीकडे वळून वखार महामंडळ चौक किंवा डावीकडे वळून उत्सव हॉटेल चौकाच्या दिशेने जावे. 16 जून रोजी सकाळी सात वाजेपर्यंत निर्बंध कायम राहणार आहेत, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले.

marketyard
पिंपरी-चिंचवडमध्ये २४६, तर मावळात १२१ नवीन रुग्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com