दहावीच्या शुभेच्छांसाठी जेव्हा थेट शिवसेनाप्रमुखांचा फोन येतो!

ShivSena chief Balasaheb Thackreay call for congratulations after passing 10th exam!
ShivSena chief Balasaheb Thackreay call for congratulations after passing 10th exam!

आपली मुलगी बोर्डात तिसरी आल्यामुळे तो शिवसैनिक आनंदात होता. इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली... पलीकडे होते त्याचे दैवत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे! त्याचे आणि मुलीचे दहावीतील यशाबद्दल बाळासाहेबांनी अभिनंदन केले आणि त्या शिवसेना कार्यकर्त्याचा आनंद गगनात मावेना. जूनमध्ये त्याच्या घरी जणू दिवाळी साजरी झाली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आजच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभाशीर्वाद दिले. त्याचवेळी बाळासाहेबांच्या या आठवणीलाही देसाई यांनी उजाळा दिला. २६ जून २००६ चा तो दिवस होता... सुभाष देसाई सांगत होते... मातोश्रीवर दैनंदिन कामासाठी मी चाललो होतो. त्यावेळी प्रवीण माईणकर हा शिवसैनिक भेटला. त्याची मुलगी तन्वी ही ९५ टक्के गुण मिळवून बोर्डात तिसरी आली होती. मातोश्रीवर गेल्यानंतर बाळासाहेबांना तन्वीच्या कामगिरीबद्दल सांगितले.
-----------------
मॉडर्नाची लस अंतिम टप्प्यात; किती असेल एका डोसची किंमत?
----------------
लस निर्मितीच्या प्रयत्नांना वेग; 'या' कंपन्या आहेत आघाडीवर
-----------------
एका शिवसैनिकाच्या मुलीने मिळवलेल्या यशाचा बाळासाहेबांना अतीव आनंद झाला आणि त्यांनी लगेच प्रवीणला फोन लावण्यास सांगितले. माझ्याच मोबाईलवर प्रवीणला फोन लावून बाळासाहेबांकडे दिला आणि त्यांनी आपल्या शिवसैनिकाचे व त्याच्या मुलीचे भरभरून कौतुक केले. आज दहावीचा निकाल लागत असताना या प्रसंगाची मला प्रकर्षाने आठवण झाली. आपल्या शिवसैनिकांच्या सुखदुःखात बाळासाहेब अतिशय आपुलकीने सहभागी होत. सर्वसामान्य शिवसैनिकांचा आधार होण्याचा हाच वारसा आज शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे चालवत आहेत, असेही देसाई यांनी आवर्जून सांगितले. इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर दोन वर्षे नोकरी करून तन्वीने अमेरिकेत एमएस पूर्ण केले. आज ती उबेर कंपनीच्या मुख्यालयात अतिशय मानाच्या पदावर कार्यरत आहे. दहावीच्या यशाबाबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले अभिनंदन आजही  आम्हा सर्वांना प्रेरणादायी ठरते आहे, असे  प्रवीण अभिमानाने सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com