
शिवसेनेचं ठरलं! मुख्यमंत्र्यांपाठोपाठ राऊतही घेणार पुण्यात सभा
पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पुणे दौरा करणार असून, राऊत यांची पुण्यामध्ये येत्या 5 मे रोजी जाहीर सभा (Sabha) होणार आहे, अशी माहिती शिवसेना शहर अध्यक्ष संजय मोरे (Sanjay More) यांनी दिली आहे. एकीकडे राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यातील वातावरण ढवळून निघालेले असताना राऊत यांची सभा होत आहे. त्यामुळे या सभेमध्ये राऊत नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आता लागून राहिले आहे. हडपसर येथील विठ्ठलराव तुपे सभागृहात (Vitthalrao Tupe Sabhagruh) शिवसेनेकडून या सभेचे आयोजन करण्यात आले असून, आगामी पालिका निवडणुका आणि सद्यस्थितीवरील राजकारणावर संजय राऊत भाषण करणार असल्याचे बोलले जात आहे. (Sanjay Raut Sabha In Pune)
हेही वाचा: राज ठाकरेंवर गुन्हा; वसंत मोरे तिरुपती बालाजीला रवाना
"अल्टीमेटमवर देश चालत नाही..."
तपूर्वी आज सकाळी राज यांनी दिलेल्या भोंग्याच्या अल्टीमेटमवर भाष्य करताना राऊत म्हणाले होते की, देश अल्टिमेटमवर चालत नाही, असा टोला राऊतांनी राज ठाकरे यांना लावला होता. तसेच सुपाऱ्या घेणाऱ्यांचा आणि देणाऱ्यांचा सरकारने शोध घेतला पाहिजे तसेच धमक्या देणाऱ्यांची ताकद नाही अशी अप्रत्यक्ष टीका राऊतांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर केली होती.
"या राज्यातील गृहखातं आणि सरकार सक्षम आहे त्यामुळे कुणी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडत नाही. आज अक्षय्य तृतीया आहे, मुस्लिम बांधवांचा ईद आहे त्यांना त्यांचे सण आनंदाने साजरे करु द्या" असेदेखील ते म्हणाले होते.
Web Title: Shivsena Sanjay Raut Sabha On 5th May In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..