

Vande Bharat Incident in Pune: Investigation Uncovers Critical Safety Failures
sakal
पुणे: संरक्षक रुळात (गार्ड रेल) अधिक अंतर राहिल्याने वंदे भारत एक्स्प्रेसचा पुणे स्थानकाच्या यार्डमध्ये अपघात झाल्याचा अहवाल मध्य रेल्वेच्या चौकशी समितीने दिला आहे. अभियांत्रिकीची चूक झाली असल्याचे वृत्त 'सकाळ'ने ३ मे रोजी प्रसिद्ध केले होते. ते आता खरे ठरले आहे. या प्रकरणातील दोषींवर लवकरच कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.