

Court Orders Protection for Elderly Couple Facing Abuse by Their Only Son
sakal
पुणे : एकुलत्या एक मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्यभर कष्ट करणाऱ्या आई-वडिलांनाच त्याच्या छळाला सामोरे जावे लागल्याचा धक्कादायक प्रकार वारजे परिसरात समोर आला आहे. व्यसनाधीन मुलाकडून सातत्याने होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळून ५८ वर्षीय आईने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत वारजे माळवाडी पोलिसांना संबंधित दांपत्याला संरक्षण देण्याचे अंतरिम आदेश दिले आहेत.