पुण्यातील मध्यवर्ती पेठांमधील दुकाने कधी उघडणार? वाचा महत्त्वाची बातमी

Shops in the peth of pune will open after june 15
Shops in the peth of pune will open after june 15

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेली 85 दिवस बंद असलेली शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठ 15 जूननंतर उघडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पेठांमधील प्रतिबंधित क्षेत्राचा आढावा घेऊन मायक्रो कॅन्टेमेंट झोन तयार करून त्यातील दुकाने वगळता अन्य भागातील दुकाने सुरू करण्याचा निर्णय पुणे महापालिका आणि व्यापारी महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला. 

पुण्याच्या इतिहासातील 'ती' काळी तारीख...ढगफुटी...आंबिल ओढा..अन्...  

शहराच्या मध्यवर्ती भागातील भवानी, नाना, रविवार, गणेश आदी पेठांचा परिसर हा घाऊक बाजारपेठेचा भाग आहे. या भागातून पुणे, पिंपरी-चिंचवडसह पश्‍चिम महाराष्ट्राला वस्तूंचा पुरवठा केला जातो. परंतु गेल्या 85 दिवसांहून अधिक काळ या बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे पुरवठा साखळी खंडित झाले आहे. तसेच व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांना दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी वारंवार व्यापाऱ्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन आणि व्यापारी महासंघाची बैठक दोन दिवसांपूर्वी झाली. त्यामध्ये प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून मग दुकाने सुरू करण्याबाबत परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार काल सौरभ राव यांनी प्रतिबंधित क्षेत्राची सकाळी पाहणी केली. पुढील निर्णय घेण्यासाठी महापालिका प्रशासन आणि व्यापारी महासंघाची सयुंक्त बैठक झाली. 

पुणे- मुळशी प्रवास करताय? सावधान...

या बैठकीत केंद्र शासनाच्या नियमानुसार एकदा कंन्टेमेंट झोन प्रसिद्ध केल्यानंतर तो किमान 14 दिवस बदलता येत नसल्याने व्यापाऱ्यांनी आणखी 5 दिवस दुकाने बंद करून सहकार्य करावे. 15 तारखेला बाधित क्षेत्राचा आढावा घेऊन प्रशासन नवीन मायक्रो कॉन्टेमेंट झोन बनवले. 15 तारखेला व्यापारी महासंघासोबत पुन्हा बैठक घेऊन त्या झोन बाहेरील भागातील 90 टक्के दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येईल , असे राव यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. प्रशासनाच्या अडचणी व मर्यादा समजून व्यापारी महासंघाने सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. तसेच त्यानंतरही दुकाने उघडण्यासंदर्भात प्रशासनाकडून चालढकल झाली, तर व्यापारी महासंघ चर्चेला बसणार नाही व पुढे उद्भविणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील, असे ही यावेळी महासंघाच्या वतीने सांगण्यात आले. 

मोटार विहिरीत कोसळून महिलेसह दोन बालकांचा मृत्यू

पोलिस सह आयुक्त रवींद्र शिसवे , महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल ,अतिरिक्त आयुक्त संजय शिंदे यांच्यासह व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, महेंद्र पितळिया ,रतन किराड, मनोज सारडा , जयंत शेटे ,अरविंद कोठारी ,विपुल अष्टेकर,शरद सारडा ,मोहन पटेल ,नितीन काकडे ,नितीन पोरवाल ,यशस्वी पटेल ,कृषी खंडेलवाल ,मिठालाल जैन ,सुरेश जेठवाणी ,राजेंद जोशी ,बॉबी मैनी ,सोहन ओसवाल ,प्रीतम बाफना ,राजू ओसवाल उपस्थित होते. 

..असं काय झालं ज्यामुळे पुणेकर पोलिसांसोबत भिडले!​

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com