पुणे शहरातील दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत खुली

मंगेश कोळपकर
Saturday, 10 October 2020

पुणे शहरातील दुकाने आता सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत उघडी ठेवण्यास महापालिकेने अखेर शुक्रवारी परवानगी दिली. या निर्णयाची आजपासूनच अंमलबजावणी झाली. ‘सकाळ’ने याबाबत गेले दोन दिवस पाठपुरावा केल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्याची दखल घेतली अन्‌ महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी आदेश प्रसिद्ध केला.

पुणे - शहरातील दुकाने आता सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत उघडी ठेवण्यास महापालिकेने अखेर शुक्रवारी परवानगी दिली. या निर्णयाची आजपासूनच अंमलबजावणी झाली. ‘सकाळ’ने याबाबत गेले दोन दिवस पाठपुरावा केल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्याची दखल घेतली अन्‌ महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी आदेश प्रसिद्ध केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात हॉटेल, मॉल आणि बार रात्री दहापर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अन्य सर्व प्रकारची दुकाने सायंकाळी सात वाजताच बंद करण्याचा आदेश होता. त्यामुळे ग्राहक आणि व्यापारी त्रस्त झाले होते. ‘सकाळ’ने पाठपुरावा करून ग्राहक, व्यापाऱ्यांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले होते.

डीएसके प्रकरण : फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट कोर्टात दाखल करा; वकिलांनी केली मागणी 

कोरोनाच्या आढावा बैठकीदरम्यान शहरातील खासदार, आमदारांनी दुकाने रात्री नऊपर्यंत उघडी ठेवण्यासाठी आदेश देण्याची उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे विनंती केली होती. पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्णय घेण्यास सांगितले. त्यानुसार पुढील आठवड्यात आदेश काढण्याचे नियोजन महापालिकेने केले. मात्र, महापौर मोहोळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हा आदेश आजच काढावा, असा आग्रह आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे धरला होता.

MPSC ची परीक्षा पुढे ढकलली ते ठीक, पण पुढची भूमिका काय?

१७ ऑक्‍टोबरपासून नवरात्र सुरू होत असून, २५ ऑक्‍टोबर रोजी दसरा आहे. तर, १४ नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होत आहे. सणासुदीच्या दिवसांत नागरिकांना खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून दुकाने रात्री नऊपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी पुणे व्यापारी महासंघ, तुळशीबाग व्यापारी असोसिएशन, लक्ष्मी रस्ता व्यापारी असोसिएशन, तसेच काही राजकीय पक्षांनी केली होती.

ग्राहक, व्यापारी यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन, दुकानांची वेळ वाढविण्यात आली आहे. मात्र, सामाजिक अंतर राखण्याचे भान आपण ठेवले पाहिजे.
- मुरलीधर मोहोळ, महापौर 

आधी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा, मगच MPSCची परीक्षा घ्या; संभाजी ब्रिगेडची मागणी

व्यवसायांवर गेले सहा महिने खूप विपरीत परिणाम झाला होता. या निर्णयामुळे अर्थचक्राला थोडी गती येईल, असे वाटते. ‘सकाळ’च्या पाठपुराव्याबद्दल व्यापाऱ्यांतर्फे धन्यवाद.  
- राहुल बोरा, अध्यक्ष, लक्ष्मी रस्ता व्यापारी असोसिएशन 

कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे केंद्र, राज्य सरकार आणि महापालिकेच्या आदेशाची सर्व नागरिकांनी अंमलबजावणी केली पाहिजे. 
- विक्रम कुमार, आयुक्त महापालिका

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shops in Pune are open from 9 am to 9 pm