esakal | आरे दुधाचा तुटवडा होण्याची शक्यता; 'या' कारणांमुळे होणार परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

Shortage of Aarey milk

शासकीय दूध योजना (आरे) साठी मराठवाड्यातील औरंगाबाद येथे दूध संकलन केले जाते. तेथून मुंबई-पुणे शहराला दूधपुरवठा केला जातो. सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरासाठी रोज साडे नऊ हजार लिटर्स दूधाची आवक होत आहे. मात्र, पुढील आठवड्यापासून दूध पुरवठ्यात घट होऊन तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

आरे दुधाचा तुटवडा होण्याची शक्यता; 'या' कारणांमुळे होणार परिणाम

sakal_logo
By
सागर शिंगटे

पिंपरी : खासगी-सहकारी दूध संस्थांकडून वाढविलेले दूध खरेदीचे दर, ग्रामीण भागांमधील हिरव्या चाऱ्याची कमतरता यासह इतर कारणांमुळे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड परिसरात आरे दूधाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दररोजच्या सुमारे साडेनऊ हजार लिटर्स दूधाच्या संकलनामध्ये 30 ते 40 टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शासकीय दूध योजना (आरे) साठी मराठवाड्यातील औरंगाबाद येथे दूध संकलन केले जाते. तेथून मुंबई-पुणे शहराला दूधपुरवठा केला जातो. सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरासाठी रोज साडे नऊ हजार लिटर्स दूधाची आवक होत आहे. मात्र, पुढील आठवड्यापासून दूध पुरवठ्यात घट होऊन तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

अल्पवयीन मुलीचे अपहरण, विनयभंग आणि...

शासकीय दूध योजनेचे दुग्धशाळा व्यवस्थापक डी.पी.बनसोडे म्हणाले,""आरे दूध संकलन आणि वितरणावर यापूर्वी 2014 मध्ये या प्रकारची समस्या उद्‌भविली होती. त्यानंतर, चालू वर्षी ही समस्या निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील दूध केंद्र चालकांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला 140 पैकी जवळपास 60 केंद्र चालक उपस्थित होते. त्यांना, बैठकीत दूधाच्या संभाव्य तुटवड्याची पूर्वकल्पना देण्यात आली आहे. सध्या पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, खडकी कॅन्टोन्मेंट, देहूरोड कॅन्टोन्मेंट आदी भागांमध्ये दररोज सुमारे साडे नऊ हजार लिटर्स दूधाचे वाटप केले जाते. सध्या दूधपुरवठा सुरळीत चालू आहे. मात्र, पुढील आठवड्यापासून मे महिन्यापर्यंत वितरणात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत तूट निर्माण होऊ शकते.'' 

पुणे : डीएसकेंची आणखी एक आलिशान कार पोलिसांनी केली जप्त!

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे अगोदरच दूध संकलनावर परिणाम झाला आहे. त्यात, खासगी आणि सहकारी दूध संस्थांनी शेतकऱ्यांना दूध खरेदीसाठी 31 ते 33 रुपये प्रतिलिटर्स इतके चांगले दर दिले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत ताक, दही करीता दूधाची मागणी वाढते. त्यामुळे, अनेक शेतकरी तिकडे ओढले गेले आहेत, असेही बनसाेडे यांनी नमूद केले. 

टिळक रस्त्यावरील 'तो' आक्षेपार्ह फ्लेक्स पोलिसांनी हटवला

तुटवडा असला तरी दरवाढ नाही ! 
आरे दूधासाठी शेतकऱ्यांकडून 25 रुपये प्रतिलिटर्स दराने शासनाकडून दूध खरेदी केली जाते. सध्या शहरांमध्ये 36 रुपये प्रतिलिटर्स या दूधाची विक्री चालू आहे. दूधाचा तुटवडा निर्माण झाला तरी आरेच्या दूधाच्या विक्रीदरात कोणतीही वाढ होणार नाही. आरे दूधाचा पुरवठा सुरळीतपणे टिकवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही डी.पी.बनसोडे यांनी सांगितले.