
श्री छत्रपती मित्र मंडळ ट्रस्टने १९९२ पासून समाजसेवा, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा जपली आहे.
३३ वर्षांच्या प्रवासात मंडळाने आरोग्य शिबिरे, बेटी बचाव बेटी पढाव, वारकऱ्यांना सेवा, ढोल-ताशा पथक अशा विविध उपक्रमांद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आज हे मंडळ फक्त गणेशोत्सवापुरते मर्यादित नसून समाजातील ऐक्य, संस्कृती आणि सेवा यांचं केंद्र बनलं आहे.
Shri Chhatrapati Mitra Mandal Trust: गणेशोत्सव म्हटलं की केशवनगरमधील श्री छत्रपती मित्र मंडळ ट्रस्टचे नाव आवर्जून घेतले जाते. १९९२ साली काही उत्साही तरुणांच्या पुढाकारातून स्थापन झालेलं हे मंडळ आज ३३ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करत आहे. सामाजिक कार्य, धार्मिक उपक्रम, सांस्कृतिक परंपरा आणि समाजसेवा या सर्वांचा सुंदर संगम या मंडळाने घडवून आणला आहे.