संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे राष्ट्रवादीच्या वाटेवर; मोठी जबाबदारी मिळणार?

टीम ई-सकाळ
रविवार, 15 डिसेंबर 2019

बारामती : राज्यातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणितेही वेगाने बदलू लागली आहेत. संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांनी आज बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची गोविंदबाग या निवासस्थानी भेट घेतली.

बारामती : राज्यातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणितेही वेगाने बदलू लागली आहेत. संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांनी आज बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची गोविंदबाग या निवासस्थानी भेट घेतली. श्रीमंत कोकाटे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असून लवकरच त्यांच्यावरही एक महत्वाची जबाबदारी शरद पवार सोपविणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. या प्रसंगी कोकाटे यांच्या समवेत प्रवीण गायकवाड, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, सुधीर पानसरे या वेळी उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आधी कोल्हे आता कोकाटे!
राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भेटही अशीच प्रवीण गायकवाड, किरण गुजर, प्रफुल्ल तावरे आदींनी शरद पवार यांच्याशी घडवून आणली होती. त्या नंतर वेगाने चक्रे फिरली आणि डॉ. कोल्हे यांना थेट राष्ट्रवादीने खासदारकीची संधी दिली. राष्ट्रवादीमधून आऊटगोईंग सुरू असताना अमोल मिटकरी व अमोल कोल्हे यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रचारादरम्यानच्या भाषणांना मिळालेल्या प्रतिसादाचा फायदा राष्ट्रवादीला थेट झाला होता. आता श्रीमंत कोकाटे यांची भेट शरद पवार यांच्याशी झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलाच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

आणखी वाचा - 'सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत चहापान नाही'

आणखी वाचा - सोशल मीडियावर नेहरूंचा अपमान केल्यानं अभिनेत्री ताब्यात  

काय मिळणार जबाबदारी?
कोकाटे यांना राष्ट्रवादीच्या थिंक टँकमध्ये महत्वाची जबाबदारी सोपविण्याचा विचार सुरू असून, त्यांच्यावर काही महत्वाची कामगिरी सोपविण्याबाबतही तयारी सुरू असल्याचे आज समजले. श्रीमंत कोकाटे यांच्या प्रभावी वक्तृत्वाचा फायदा राष्ट्रवादीला निश्चित होणार असल्याने त्यांना पक्षात सामावून घेत त्यांचा समावेश थिंक टँकमध्ये करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shrimant kokate sambhaji brigade may join ncp soon meets sharad pawar