पुण्याच्या श्वेताची अवकाश भरारी

बाबा तारे
गुरुवार, 24 मे 2018

औंध (पुणे) : भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि आयआयएम बेंगलोर यांनी जगभरातल्या हौशी खगोलप्रेमींना खगोलशास्त्राचे ऑनलाईन प्रशिक्षण देणाऱ्या पुण्याच्या श्वेता कुलकर्णीची देशातील सर्वोत्कृष्ट उद्योजिकांमध्ये निवड केली आहे.

खगोलशास्त्राच्या प्रचार आणि प्रसारामध्ये गेली सहा वर्ष काम करणारी श्वेता ही देशातील सर्वोत्कृष्ट शंभर महिला उद्योजिकांपैकी एक ठरली आहे. आयआयएमबी अंतर्गत एनएसआरसीइएल मार्फत राबवल्या जाणाऱ्या 'वूमन स्टार्टअप प्रोग्रॅम' मध्ये भारतातील सात हजार महिला उद्योजिकांपैकी सर्वोत्कृष्ट शंभर महिला उद्योजिका निवल्या गेल्या.

दोन टप्प्यांमध्ये झालेल्या या निवडीत महाराष्ट्रातून निवडल्या गेलेल्या दहा सर्वोत्कृष्ट महिलांपैकी पुण्यातून श्वेता ही एकमेव महिला आहे. या निवडीनंतर श्वेता नुकतीच बेंगलोर येथे प्रशिक्षण घेऊन आली आहे. तिच्या कामासाठी तिला आयआयएम नागपूर तसेच भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाकडून आर्थिक मदत आणि मार्गदर्शन मिळणार आहे.आपल्या देशात खगोलशास्त्र या विषयाबद्दल फारशी जागरूकता आढळून येत नाही त्यासाठी श्वेता जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.याविषयी बोलतांना श्वेता म्हणाली, "खगोलशास्त्र म्हणजे आपल्या भोवतालच्या भौतिक विश्वाचा अभ्यास, हे एक प्रचंड आणि आकर्षक आव्हान आहे.खगोलशास्त्र हा एक गुंतागुंतीचा आणि न कळणारा विषय आहे असे समजण्याचे कारण नाही.

भारतातल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या विषयात रस घेऊन पुढील संशोधन करण्याची गरज तर आहेच पण समाजातल्या सर्वांपर्यंत खगोलशास्त्राची निदान प्राथमिक माहिती पोहचल्यास खगोलशास्त्राकडे अधिकजण वळतील यात शंका नाही." खगोलशात्राबद्दल रंजक पद्धतीने माहिती देणाऱ्या उपक्रमांची कल्पक आखणी करण्याचे आव्हान श्वेताने घेतले आहे. AstroNspace या श्वेताच्या नवीन प्रकल्पाअंतर्गत ऑनलाईन कोर्सेस च्या माध्यमातून खगोलशास्त्र लोकांपर्यंत पोहचवण्याचा तिचा प्रयत्न आहे. एका मराठी मुलीची खगोलशास्त्र आणि उद्योजकता या दोन्ही विषयांमधील हि भरारी अतिशय कौतुकास्पद व अभिमानाची बाब आहे.विशेष म्हणजे या कार्यक्रमांतर्गत खगोलशास्त्राशी संबंधित प्रसार आणि प्रचाराचे काम  करणारी श्वेता ही भारतातील सर्वात लहान वयातील उद्योजिका ठरली आहे. 

"मनोरंजनातून खगोलशास्त्र शिकवणे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचवणे यावर माझे कार्य नेहमीच चालू असते. खगोलशास्त्राची प्राथमिक माहिती रंजक पद्धतीने व कल्पकतेने लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तज्ञ आणि कलावंत माझ्याबरोबर काम करत आहेत. या विषयांमधील माझे काम वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याच्या भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या कर्तव्याशी देखील सुसंगत आहे. माझी जरी सर्वोत्कृष्ट महिला म्हणून निवड झाली असली तरी माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे स्वयंसेवक, निमिष आगे, सिद्धार्थ मेहेंदळे आणि अनिरुद्ध देशपांडे यांच्याशिवाय तसेच माझ्या आई वडिलांच्या अफाट विश्वासाशिवाय हे काहीच शक्य नव्हते." 
- श्वेता कुलकर्णी, खगोलसंशोधक

Web Title: shweta kulkarni from pune selected as topmost entrepreneurship