शिवाजीनगर : पोस्टल मतमोजणीत सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

Election Results 2019 : शिवाजीनगर मतदारसंघात नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी पोस्टल मतमोजणीच्या पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे तर काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट पिछाडीवर आहेत. हे दोघेही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा प्रथमच उतरले आहेत.

Vidhan Sabha 2019 : पुणे शहरात नीचांकी संख्येने मतदान झालेल्या मतदारसंघांपैकी एक शिवाजीनगर मतदारसंघ. या मतदार संघातून भाजपचे नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी पोस्टल मतमोजणीच्या पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे तर काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट पिछाडीवर आहेत. हे दोघेही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा प्रथमच उतरले आहेत. त्यामुळे यांच्यातील लढत कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

पुण्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष; या आहेत बिग फाईट! | Election Results 2019 
भाजपने आमदार विजय काळे यांच्याऐवजी शिरोळे यांना या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. भाजपने माजी खासदार अनिल शिरोळे यांच्याऐवजी गिरीश बापट यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. त्यानंतर, आता अनिल शिरोळे यांचा मुलगा सिद्धार्थला भाजपने विधानसभा निवडणुकीला उमेदवारी दिली. शिवाजीनगर मतदारसंघात आपचे उमेदवार मुकुंद किर्दत आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल कुऱ्हाडे हेही निवडणूक लढवित आहेत. 

पुण्यात जमावबंदी; कोल्हापूरात मिरवणूकांना बंदी | Election Results 2019

या मतदारसंघात तीन लाख पाच हजार 587 मतदार आहेत. त्यातील एक लाख 33 हजार 772 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुमारे 43. 78 टक्के मतदान या मतदारसंघात झाले आहे.या मतदारसंघातील औंधमधून 52 टक्के, प्रभात रस्ता, आपटे रस्ता, सेनापती बापट रस्ता परिसरातून 51 टक्के तर गोखलेनगर-जनवाडी परिसरातून 49 टक्के, खडकीतून 48 टक्के मतदान झाले आहे. वस्ती भागातून झालेल्या मतदानाबरोबरच सोसायट्यांमधूनही मतदान चांगल्या प्रकारे झाले आहे. मतदारसंघात पाच प्रमुख उमेदवार आहेत. त्यामुळे मतविभागणी होण्याची शक्‍यता असून मताधिक्या कोणाच्या पदरात पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddharth Shirole leads in postal count in Shivaji Nagar in Maharashtra Vidhan Sabha 2019