सातारा रस्त्यावरील पदपथ झाडा झुडुपांमध्ये लुप्त: गवत वाढल्याने पदपथाची दुरवस्था 

The sidewalk on Satara Road is lost in the bushes
The sidewalk on Satara Road is lost in the bushes
Updated on

सहकारनगर : सातारा रस्ता बीआरटी मार्ग, पुर्नविकासाच्या कामात उभारण्यात आलेले पदपथावर गवत वाढलेल्या विद्रुपीकरण झाले असून सातारा रस्त्यावरील पदपथ वाढलेल्या झाडा, झुडपात लुप्त झाले आहेत. तसेच पदपथावर फ्लाँवर बेड उभारण्यात आले यांची देखभाल व निगा राखली जात नसल्याने पथपथ व फ्लॉवर बेडवर गवत व झुडपे वाढल्याने सातारा रस्त्यावरील पदपथ झाडा झुडपेने व्यापला आहे.त्यामुळे रस्त्याचे विद्रुपीकरण होत आहे.याकडे मात्र मनपा पथ विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

हे ही वाचा : गुलाबी थंडीतही व्यायामासाठी सायकलिंगला ग्रामीण भागातही पसंती

यावेळी रुपेश तुरे (सामाजिक कार्यकर्ते)म्हणाले, ''सातारा रस्त्यावरील पदपथावर फ्लॉवर बेड उभारले गेले मात्र याठिकाणी गवत व झाडे झुडपे यांची योग्य निगा राखली जात नाही याची दुरवस्था झाली असून कचरा कुंडी बनली आहे. याकडे मनपा प्रशासननाने लक्ष देणे गरजेचे आहे.''

यावेळी प्रशांत कुंभार (उपअभियंता, मनपा पथ विभाग) म्हणाले, ''सातारा रस्ता बीआरटी मार्गाच्या पुर्नविकासाच्या कामामध्ये सुशोभीकरणासाठी अंतर ठेवून लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या होत्या.पदपथ फ्लॉवर बेडवरील झाडांची उंची वाढली आहे त्यात गवत वाढले आहे तेही लवकर काढण्यात येईल.''

हे ही वाचा : शेतकरी संजय देशमुख यांना पुण्यातील मोदीबाग येथील निवासस्थानी बोलावून शरद पवारांनी घेतली भेट

''बीआरटी मार्गाच्या पुर्नविकासाच्या कामामध्ये सुशोभीकरणावर भर देण्याचा भाग म्हणून दुभाजक उभारण्यात आले. मात्र दुभाजकवर गवत वाढले आहे तर फ्लाँवर बेडमध्ये कचरा टाकला जात आहे. यांची देखभाल व निगा राखली जात नसल्याने पदपथ व फ्लॉवर बेडवर गवत व झुडपे वाढल्याने कचरा कुंडी बनत चालली आहे.''

हे ही वाचा : पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com