esakal | ३५० युवक- युवतींनी सिंहगडाचा पश्‍चिम कडा केला सर
sakal

बोलून बातमी शोधा

सिंहगड : दोराच्या साह्याने कड्यावरून गडावर चढताना युवक.

तानाजी मालुसरे यांनी ३५० वर्षांपूर्वी हा किल्ला ताब्यात घेतला. त्या कड्यावरून आम्ही दोरावर गाठी बांधून आलो, तरी अवघड गेले. त्याकाळी त्यांनी कसे युद्ध केले असेल, याची कल्पना आपण करू शकत नाही. आम्ही शिवकाल पुन्हा एकदा अनुभवला.
- सौरभ जगताप, मोहिमेतील सहभागी युवक

३५० युवक- युवतींनी सिंहगडाचा पश्‍चिम कडा केला सर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘रणांगणावर रक्त सांडले, रणी धुरंदर वीर स्मरा... दुर्गम गड गाजविला रात्री, नरवीर केसरी घ्या मुजरा...’ अशा काव्यपंक्तींमधून आणि ‘जय भवानीऽ जय शिवाजीऽऽ’च्या जयघोषात आज (शनिवार) ३५० युवक- युवतींनी सिंहगडाचा पश्‍चिम कडा सर करीत जणू पुन्हा एकदा सिंहगडावर यशस्वी चढाई केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मराठ्यांच्या इतिहासातील एक देदीप्यमान पर्व असलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांनी गाजविलेल्या पराक्रमाला महाराष्ट्रातील तरुणाईने शनिवारी (ता. १५) प्रत्यक्ष गडावर जाऊन आगळीवेगळी मानवंदना दिली. मावळ्यांच्या पोशाखातील तरुणाईने सुमारे ४० फुटी कडा दोराच्या साह्याने चढत मराठ्यांच्या शौर्याचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवला. इतिहासप्रेमी मंडळाच्यावतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त आणि सिंहगड सर केल्याच्या घटनेला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमास सर्जिकल स्ट्राइकचे रणनीतिकार लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त), ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, इतिहासप्रेमी मंडळाचे मोहन शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे विमानतळावर अपघात होता होता वाचला; वाचा काय घडले!

निंभोरकर म्हणाले, ‘‘तानाजी मालुसरे यांनी गडावर केलेल्या चढाईप्रमाणे लष्करातर्फेही शत्रूवर चढाई केली जाते, असा अनुभव आहे. आपण इतिहास विसरलो, तर भूगोल निश्‍चित राहात नाही. पूर्वजांनी गाजविलेला इतिहास आपल्याला माहिती हवा, त्यातून तरुणांना प्रोत्साहन मिळेल. मराठ्यांनी अटकेपार झेंडा रोवला. आजच्या पिढीला या गोष्टी माहिती हव्यात.’’

आणखी वाचा - पुणे-सातारा हायवेवर उद्या मार्गात बदल

बलकवडे म्हणाले, ‘‘ज्या देशातील व्यक्ती घरातील कार्य सोडून देशासाठी बाहेर पडते, तो देश नक्कीच पुढे जातो. आपला संघर्ष राष्ट्रासाठी आहे, देशभक्तीचा विचार पुढे गेला पाहिजे, ही भावना शिवरायांनी मावळ्यांमध्ये रुजविली. त्यातून शिवरायांनी स्वराज्य निर्माण करीत लोककल्याणकारी आदर्श सुराज्य निर्माण केले.’’ 
 
‘गनिमी कावा, धाडसामुळे गड जिंकला’
मोहन शेटे म्हणाले, ‘‘सिंहगडासारखा बळकट दुर्ग आणि उदयभानसारखा कडवा मोगल किल्लेदार असताना गड जिंकणे सोपे नव्हते; पण अतुलनीय धाडस, गनिमी कावा तंत्राचा अचूक वापर, गडाचा अभ्यास यामुळे मराठ्यांनी हा गड जिंकून घेतला. ती रात्र होती १६७० मधील माघ वद्य नवमीची, त्यामुळे त्यांच्या शौर्याला आम्ही केवळ पूजा, आरती व घोषणांनी नव्हे, तर प्रत्यक्ष तो अनुभव घेऊन मानवंदना दिली.’

loading image