सिंहगड- राजगड- तोरणा मॅरेथॉन स्पर्धेत यंदा १३५० स्पर्धकांचा सहभाग

पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत सिंहगड- राजगड- तोरणा (एसआरटी) अल्ट्रा ट्रेल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा उद्या शनिवार दि.११ डिसेंबर रोजी सिंहगड पायथा, गोळेवाडी येथे पहाटे साडे पाच वाजता होत आहे.
Marathon Competition
Marathon CompetitionSakal

खडकवासला - पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत सिंहगड- राजगड- तोरणा (एसआरटी) अल्ट्रा ट्रेल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा उद्या शनिवार दि.११ डिसेंबर रोजी सिंहगड पायथा, गोळेवाडी येथे पहाटे साडे पाच वाजता होत आहे. यंदाच्या स्पर्धेत भारतातील २० राज्यांच्या ५४ शहरातून तब्बल एक हजार ३५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला गेला आहे .

वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. हि मॅरेथॉन महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या क्रिडा विश्वाच्या शिरपेचात मानाचा तुरा ही स्पर्धा ठरलेली आहे. जागतिक वारसा असलेल्या पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत शेकडो वर्ष ताठ मानेने उभ्या असलेल्या “सिंहगड- राजगड- तोरणा” या किल्यांवरून धावण्याची महाराष्ट्रातील पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि भारतातील सर्वोत्तम स्पर्धा आहे.

Marathon Competition
दोन मोटारसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी

श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि सह्याद्रीतील गडकोटांच्या गौरवशाली ऐतिहासिक सुवर्णक्षणांची आठवण करून देणारया अतिशय चित्तथरारक आणि रोमांचकारी असलेल्या SRT स्पर्धेसाठी वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशन परिवाराने भारतातून आलेल्या १३०० रनर्सच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. फाऊंडेशनचे दिग्विजय जेधे,अनिल पवार, मारूती गोळे, महेश मालुसरे, मंदार मते, हर्षद राव, राजेश सातपुते, अमर धुमाळ, हरिष गवई, सुजीत ताकवणे यांनी याचे आयोजन केले आहे. यासाठी ४०० स्वयंसेवक ठिकठिकाणी हजर आहेत.

एसआरटी म्हणजे काय

एसआरटी म्हणजे सिंहगड- राजगड- तोरणा या डोंगर रांगेतून धावणे. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. यामध्ये अनुक्रमे धावण्यासाठी ११ किलोमिटर, २५ किलोमिटर आणि ५३ किलोमिटर या तीन प्रकारात घेण्यात येते.

-११ किलोमीटर स्पर्धा - (सहभागी स्पर्धक- ३७६)

बक्षीस समारंभ- सिंहगड पायथा, गोळेवाडी- सकाळी ९ वा.

-२५ कि.मी सिंहगड राजगड ( सहभागी स्पर्धक- ५२६ )

बक्षीस समारंभ - राजगड पायथा,गुंजवणे- सकाळी १०वा

-५३ कि.मी- सिंहगड- राजगड- तोरणा ( सहभागी स्पर्धक-४१०)

बक्षीस समारंभ - तोरणा पायथा, वेल्हा - दुपारी १ वा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com