पुणे : शहरातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत मनपा आयुक्त काय म्हणाले पाहा!

Coronavirus_Pune
Coronavirus_Pune
Updated on

पुणे : शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. कोरोनाची लक्षणे न दिसणाऱ्या परंतु बाधित असलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरातच विलगीकरण करून ठेवण्याबाबत विचार सुरू आहे.

'आयसीएमआर'च्या नियमावलीनुसार ही बाब असली तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी गुरुवारी वेब पत्रकार परिषदेत दिली. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यावेळी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त गायकवाड म्हणाले, महापालिकेकडून अनलॉक- 1 मध्ये शहरातील सर्व झोपडपट्टी परिसर आणि प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले आणि कोरोनाचा धोका असलेल्या व्याधीग्रस्त नागरिकांवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तसेच पावसाळ्यामुळे सर्दी, तापाची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यावर भर देण्यात येईल. शहरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. शहरातील उद्याने, जॉगिंग पार्क नागरिकांसाठी हळूहळू खुली करण्यात येत आहेत. तसेच, तुळशीबाग परिसरही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

पोलिस आयुक्तालयात आता व्हर्च्युअल अपॉइंटमेंट :

पोलिस आयुक्त के. वेंकटेशम म्हणाले, शहरातील लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर गुन्ह्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तालयात यापूर्वी नागरिकांना भेटण्यासाठी दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच ही वेळ होती. त्याऐवजी नागरिकांना या कालावधीत पोलिसांकडून व्हर्च्युअल अपॉइंटमेंट देण्यात येईल. संबंधित व्यक्तींना मोबाईलवरून आपल्या अडचणी मांडता येतील. या धर्तीवर लवकरच पोलिस ठाण्यातही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

पालखी सोहळ्याबाबत लेखी सूचना उद्यापर्यंत : 
यंदाची आषाढी वारी पायी होणार नाही, याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. पालखी सोहळ्यात किती नागरिकांचा समावेश असावा, तसेच काय निकष असतील याबाबत बैठकीत निर्णय झाला असला तरी उद्यापर्यंत लेखी सूचना काढण्यात येतील, असे जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com