राज्यातली स्थिती भयानक; रुग्णांना बेड मिळणं झालंय अवघड, कंट्रोल रूमकडे वाढले कॉल्स

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

राज्यातील कोरोनाबाबत हेल्पलाईन पुण्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. यासाठी आठ फोनच्या स्वतंत्र लाइन दिवस-रात्र उपलब्ध करून दिल्या आहेत. दररोज चोवीस तास या कंट्रोल रुममधील फोन खणखणत असतात. आठ तासांच्या एका शिफ्टमध्ये सुमारे सहाशे ते आठशे कॉल येतात. दिवसभरात या कॉलची संख्या सुमारे दोन हजारच्या आसपास जाते.

पुणे : शहरांमधील नॉन कोविड रुग्णांना रुग्णालयात उपचारांसाठी खाटा मिळणे अवघड झालंय. सगळीकडे पायपीट आणि फोना-फोनी करून हवालदिल झालेले नातेवाईक आता मदतीसाठी राज्याच्या कोरोना नियंत्रण कक्षाकडे वळत असल्याचे चित्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रकर्षाने दिसतंय. यात पुण्या-मुंबईतून येणाऱ्या कॉलची संख्या मोठी आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

राज्यातील कोरोनाबाबत हेल्पलाईन पुण्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. यासाठी आठ फोनच्या स्वतंत्र लाइन दिवस-रात्र उपलब्ध करून दिल्या आहेत. दररोज चोवीस तास या कंट्रोल रुममधील फोन खणखणत असतात. आठ तासांच्या एका शिफ्टमध्ये सुमारे सहाशे ते आठशे कॉल येतात. दिवसभरात या कॉलची संख्या सुमारे दोन हजारच्या आसपास जाते. अशा कंट्रोल रूमचा गेल्या दोन ते तीन दिवसांमधील रुग्णालयात उपचारांसाठी बेड मिळत नाहीत, कुठल्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होता येईल, कोणत्या हॉस्पिटलमध्ये जागा आहे, अशा कॉलची संख्या वाढत आहे. कॉलचा हा बदललेल्या ट्रेंडने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दिलीप बंड म्हणतात, विद्यापीठ रस्त्यावरील तीनही पूल पाडणे योग्यच

राज्यात कोरोनाचा भयंकर उद्रेक सुरू आहे. देशातील 36 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यातही अँक्टिव्ह रुग्णांची संख्या देशाच्या तुलनेत 43 टक्के आहे. अशा पार्श्वभूमिवर खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाची लक्षणे असणाऱया रुग्णांनाच नाही, तर कोरोनाच्या संसर्गाची लक्षणे नसणाऱया नॉन कोविड रुग्णांनाही रुग्णालयात बेड मिळत नसल्याचे कॉल येत आहेत. पुण्या-मुंबईतील या कॉलची संख्या सर्वाधिक आहे, असेही येथील अधिकाऱयांनी सांगितले. 

 Big Breaking : पुणे विद्यापीठ चाैकातील ते दोन पूल पाडण्याबाबत झाला मोठा निर्णय
 
कॉल सेंटरमधील आतापर्यंतचे ट्रेंड
1.   काय आहे कोरोना?
कोरोनाच्या रुग्णांचे निदान सुरवातीला होऊ लागल्यानंतर या कॉल सेंटरमध्ये कोरोनाबाबत अधिकृत माहिती विचारणारे फोन येत होते. परदेश दौरा, परदेशातून आलेल्या व्यक्तीचा संपर्क या बाबतची माहिती विचारण्याकडे लोकांचा कल होता. कशामुळे कोरोना होतो आणि कशामुळे होत नाही, याचे स्पष्टीकरण, त्याची शास्त्रिय माहिती कॉलवरून दिली जात होती. सर्वसाधारणतः मार्चअखेरपर्यंत हा ट्रेंड होता.

रेल्वेच्या जागेवरील झोपडीधारकांसाठी महत्त्वाची बातमी; मध्य रेल्वेने 'एसआरए' दिल्या 'या' सुचना

2.    जेवण, रेशन कुठे मिळेल?
मार्चमध्ये पहिले लॉकडाऊन सुरू झाले. एक-एक उद्योग बंद होऊ लागले. बांधकामे थांबले. मजूरांच्या हाताचे हाम सुटले. त्यानंतर जेवण-खाण कुठे मिळेल, रेशन दुकानातून धान्य कुठं मिळेल, असे फोन सुरू झाले. आलेल्या प्रत्येक कॉलला प्रतिसाद देताना समस्येवरचा मार्ग सांगण्यात येत होता. त्यामुळे कॉल सेंटर अशा कॉलचे प्रमाण वाढले. त्यातील बहुतांश कॉल परराज्यातून महाराष्ट्रात काम करण्यासाठी आलेल्या मजूरांचे असे. सुमारे एप्रिलच्या मध्यापर्यंत फोनचा असा कल दिसत होता.

पुणे महापालिकेतील पदाधिकारी महिलेचा कोरोना रिपोर्ट समोर; रिपोर्टमध्ये...

3.    लॅब टेस्टिंग कुठे करता येईल?
राज्यातील बहुतांश रुग्णांना कोणतेही स्पष्ट लक्षणे दिसत नसतानाही त्यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. अशा असिंम्टेमॅटिक रुग्णांमध्ये कदाचीत आपण असू, अशी निर्माण होणारे नागरिकांच्या फोनची एप्रिलच्या मध्यापासून वाढली. ती साधारणतः मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू होती. त्यात कोणी टेस्ट करावी, ती कुठे करावी, त्यातील डॉक्टरांचा सल्ला या प्रत्येक प्रश्नाची समाधानकारक उत्तरे कॉलसेंटरमधील नागरिक देत होते.

भोरच्या रस्त्यांवर मुंबईच्या गाड्यांची गर्दी    

4.     ई-पास कुंठ आणि कसा मिळणार?
देशात तिसऱया लॉकडाऊनच्या शेवटच्या टप्प्यात राज्यातील मजूरांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी ई-पासची सुविधा कुठे आहे, तो कसा मिळणार, त्यासाठी काय करावे लागणार अशी माहिती घेण्यासाठी कॉल सेंटरवर फोन करणाऱयांची संख्या वाढली. हे कॉल सेंटरचा चौथा ट्रेंड ठरला.

शिक्रापूर डेंजर झोनमध्ये, दोघांना कोरोनाची लागण  

5.    आमच्याच गावात आम्हाला घेत नाहीत
ई-पास घेऊन आपापल्या राज्यात गेलेल्या नागरिकांच्या फोनने पुन्हा कॉलसेंटरच्या फोन खणखणू लागले. आता कारण, असं होत की, महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात गेलेल्या नागरिकांना त्यांच्याच लोकांनी गावात प्रवेश बंद केला होता. महाराष्ट्रात या कॉल सेंटरवर फोन केल्यावर जेवण मिळाले होते. आता त्याच आशेनं ते मजूर हाच नंबर पुन्हा डायक करत असल्याचे दिसते. महाराष्ट्रात आम्हाला काम मिळालंच, पण लॉकडाऊनमध्ये दोन्ही वेळेला पोटभर जेवण मिळालं. पण, आमच्याच राज्यात आता आम्हाला स्थान नाही, अशी भावना फोनवरून व्यक्त करत आहेत.

खेड तालुक्यात दोघांच्या मृत्यूने वाढली चिंता 

6.    बेड कोणत्या हॉस्पिटलमध्ये मिळेल?
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच सरकारी रुग्णालये रुग्णांनी भरली. महापालिकेची रुग्णालयेही कमी पडू लागली. त्यामुळे खासगी रुग्णालयांवरील वैद्यकीय सेवेचा ताण वाढला. त्यातून 80 टक्के खाटा कोरोनाच्या रुग्णांसाठी राखिव ठेवण्याचा निर्णय घेतल्याने कोरोना नसलेल्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांमध्ये जागा मिळत नसल्याचे कॉल सेंटरला आलेल्या फोनवरून दिसते. हा ट्रेंड गेल्या दोन ते तीन दिवसांपासून प्रकर्षाने जाणवू लागला आहे.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The situation in the state is difficult for patients to get a bed