पुणे विद्यापीठाचे क्रेडीट कोर्स 'स्वयं'वर; जुलैपासून होणार सुरवात!

ब्रिजमोहन पाटील
शनिवार, 27 जून 2020

- सहा विषयांवरील अभ्यासक्रम
- ईएमआरसीने निभावली महत्त्वाची भूमिका
- जुलैपासून ऑनलाईन शिक्षण

पुणे ः पदवीच्या ठरलेल्या अभ्यासक्रमाशिवाय आवांतर ज्ञान घेण्यासाठी क्रेडीट कोर्सचे महत्त्व वाढत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने (ईएमआरसी) विकसित केलेले सहा क्रेडीट कोर्स केंद्र शासनाच्या 'स्वयं' पोर्टलवर उपलब्ध झाले आहेत. राज्यशास्त्र आणि व्यवस्थापन विषयातील क्रेडीट कोर्स करणे देशभरातील पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शक्‍य होणार आहे.

- कौतुकास्पद! कोरोना संकटात 'शेल्टर'ने दिले 12 हजार कुटुंबांना शेल्टर

'कोरोना'मुळे ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व वाढत आहे. त्यासाठी पुणे विद्यापीठाने 'इं कंटेन्ट' तयार करणे, हे साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी काम हाती घेतले आहे. तसेच पुणे विद्यापीठाने 40 टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन करण्यासाठीही तयारी सुरू केली आहे. दरम्यान 2019 पासून, पुणे विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमासाठी चॉईस बेस क्रेडीट सिस्टीम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम यापद्धतीने शिकवण्यात आल्यानंतर आता यंदा द्वितीय वर्षही त्याच्या कक्षेत आले आहे. या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना 'स्वयं'च्या माध्यामातून ऑनलाईन शिक्षणातून क्रेडीट कोर्स करता येणार आहेत.
पुणे विद्यापीठाच्या सहा क्रेडीट कोर्सला 'स्वयं'च्या विद्या परिषदेने मान्यता दिली आहे.

- शाळा सुरू करण्याबाबत देशभरातील मुख्याध्यापक काय म्हणताहेत? वाचा सविस्तर!

''स्वयं'च्या माध्यमातून आत्तापर्यंत 20 टक्के क्रेडीट ट्रान्सफर शक्‍य होते, मात्र आता ते 40 टक्‍क्‍यांवर नेले जाणार आहे. देशातील नामांकित प्राध्यापकांनी तयार केलेले अभ्यासक्रम स्वयंवर सर्व विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क उपलब्ध असतात. पुणे विद्यापीठानेही 6 अभ्यासक्रम तयार केले आहेत. ते जुलै महिन्यापासून 'स्वयं'वर उपलब्ध असणार आहेत. यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी.''
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, पुणे विद्यापीठ

''क्रेडीट कोर्समधील बहुतांश विषय व्यवस्थापन शाखेशी संबंधित असले तरी कोणत्याही पदवीचे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. 8 ते 12 आठवड्याचे हे अभ्यासक्रम आहेत. यास प्रत्येकास 3 ते 4 क्रेडीट मिळणार आहेत. तसेच प्रत्येक आठवड्याला अंतर्गत मूल्यांकनासाठी परीक्षा असेत. तर सर्वात शेवटची परीक्षा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये 'स्वयं'कडून घेतली जाते.''
- विवेक नाबर, निर्माता, ईएमआरसी.

तुमचा जुना अॅंड्राॅइड फोन शाळेला दान करून गरिब विद्यार्थ्यांना करा मदत

हे आहेत सहा कोर्स
पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांनी तयार केलेल्या अभ्यासक्रमाला 'ईएमआरसी'मध्ये इ कंटेंट'
म्हणून विकसित केले आहे. त्यात व्हिडीओ, एफएक्‍यू, केज स्टडीड, संदर्भ, एमसीक्‍यू आदींचा समावेश आहे. पॉलिटिकल आयडियालॉजी', 'मायक्रो इकॉनॉमिक्‍स', 'स्पेशल सर्व्हिसेस मार्केटींग इन इंडिया', 'फंडामेटल्स ऑफ ऑफिस मॅनेजमेंट अँड मेथडस', 'फंडामेटल्स ऑफ इंडिया फायनान्स अकाऊंटींग' आणि 'बिझनेस इथिक्‍स' हे क्रेडीट कोर्स आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे कोर्स अनुक्रमे डॉ. वहिदा शेख (इनामदार महाविद्यालय), डॉ. मानसी कुर्तकोटी (डी. वाय. पाटील), डॉ. बागेश्री देव (बीएमसीसी), डॉ. रुपाली शेठ (हुजूरपागा), डॉ. श्‍वेता मेहता (डीईएस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, सांगली), डॉ. अर्चना वेचलेकर (झी एज्युकेशन) यांनी हे तयार केले आहेत. असे ईएमआरसीचे समन्वयक श्रीकांत ठकार यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six credit courses developed by Savitribai Phule Pune University available on Central Governments Swayam portal