
मोटारसायकल वरुन येत रोकड चोरुन नेलेल्या सराईत गुन्हेगारांना बारामती शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी या बाबत माहिती दिली.
बारामती : मोटारसायकल वरुन येत रोकड चोरुन नेलेल्या सराईत गुन्हेगारांना बारामती शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी या बाबत माहिती दिली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्यातील कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोपदेव घाटात 29 नोव्हेंबर रोजी तीन मोटारसायकलवरुन आलेल्या आठ जणांनी एका व्यक्तीस अडवून त्याच्या सॅकमधील 1 लाख 30 हजार रुपये लुटून नेले होते. या गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल बारामतीतील फलटण चौकात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे, सहायक पोलिस निरिक्षक सचिन शिंदे, प्रकाश वाघमारे, सहायक फौजदार संजय जगदाळे, रुपेश साळुंके, ओंकार सिताप, सुहास लाटणे, दशरथ इंगवले, बंडू कोठे, योगेश कुलकर्णी, अजित राऊत, तुषार चव्हाण, अकबर शेख यांनी करिझ्मा व पल्सर कंपनीच्या दोन मोटारसायकलवर असलेल्या रोहित सुरेश बाबर (रा. महात्मा फुले सोसायटी, सासवड, ता. पुरंदर) व राजेश सिताराम निघोल (रा. दत्तनगर सासवड) या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले, तेव्हा त्यांनी प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंचरसाठी नगरपंचायतीची मागणी
मात्र त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्यांचे साथीदार चेतन उर्फ भैय्या वैराग, सनी मिसाळ, जगन्नाथ दत्ता वाघमारे व बाबू (पूर्ण नाव माहिती नाही) (सर्व रा. महात्मा फुले सोसायटी, सासवड, ता. पुरंदर) यांच्या मदतीने ही चोरी करुन सर्वांनी ही रक्कम वाटून घेतल्याचे कबूल केले. हे सर्व पैसे खर्च केल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्यात बहाद्दरांनी पळविली दारुच्या बाटल्यांची तब्बल 32 खोकी
दरम्यान या सर्वांना मोटारसायकलसह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यातील काही जणांवर या पूर्वीचे कोंढवा, सासवड या पोलिस ठाण्यात चार गंभीर गुन्हे दाखल आहेत.
(संपादन : सागर डी. शेलार)