भटक्या श्‍वानामुळे आमचीच ‘हाड्हाड्’

सु. ल. खुटवड
Friday, 22 January 2021

हल्ली आम्ही बायको आणि वाघालासुद्धा एवढे घाबरत नाही, तेवढे भटक्‍या कुत्र्याला घाबरतो. बायको माहेरी असेल तर तिच्या फोटोसमोर उभे राहून, तिला उलटे बोलू शकतो तसेच तिच्यावर खेकसूही शकतो. तसेच वाघ पिंजऱ्यात असेल तर त्यालाही खुले चॅंलेजही देऊ शकतो.

हल्ली आम्ही बायको आणि वाघालासुद्धा एवढे घाबरत नाही, तेवढे भटक्‍या कुत्र्याला घाबरतो. बायको माहेरी असेल तर तिच्या फोटोसमोर उभे राहून, तिला उलटे बोलू शकतो तसेच तिच्यावर खेकसूही शकतो. तसेच वाघ पिंजऱ्यात असेल तर त्यालाही खुले चॅंलेजही देऊ शकतो. मात्र, भटक्‍या कुत्र्याबाबत आपण हे करू शकत नाही. तो थेट पोटरीच पकडतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हल्ली आमची रोजच रात्रपाळी असते. एकदा कामावरून सुटल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास सोसायटीच्या गेटवर एक कुत्रा आमच्या अंगावर भुंकला. त्यावेळी स्वसंरक्षणासाठी आम्ही त्याच्यावर छोटा दगड मारला. तेव्हापासून त्या कुत्र्याने आमच्याशी वैर पत्करलंय. रात्री दोनच्या सुमारास तो गॅंग घेऊन आमची वाटच पाहत असतो. आमच्या अंगावर भुंकतो व दुचाकीचा पाठलाग करतो. अनेकदा हा कुत्रा सोसायटीच्या आवारात येऊन, रात्रभर भुंकतो. त्यानंतर आम्ही अनेकदा त्याची माफीही मागितली. ‘प्रकरण मिटवून घे’ अशी विनंतीही केली. मात्र, ‘चुकीला माफी नाही’ असंच त्याचं वागणं आहे.

Serum Institute Fire:सीरमच्या आगीनंतर संभाजी ब्रिगेडचं पत्रक; 5 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

कुत्र्यासंदर्भात आम्ही सोसायटीच्या चेअरमनकडे तक्रार केली. मात्र, नेहमीप्रमाणे त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यावर आम्ही त्यांचा मोठ्याने त्रिवार निषेधही केला. मात्र छद्मीपणे हसत त्यांनी विषयाला बगल दिली. त्यानंतर आम्ही थेट पोलिस ठाणे गाठले. ‘भटक्‍या कुत्र्याबाबत आमची फिर्याद असून, कुत्र्याला तडीपार करा,’ अशी मागणी आम्ही केली. त्यावर तेथील साहेबांनी आमचे शिक्षणच काढले व महापालिकेत जाऊन तक्रार करण्याचा सल्ला दिला.

Serum Institute Fire: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

महापालिकेत आम्ही चार- पाच वेळा चकरा मारल्या. पण तिथे अनेकांनी आम्हाला ‘हाड्‌ हाड’ केले. त्यानंतर आम्ही मंदिरात जाऊन दत्तमहाराजांना शरण गेलो. ‘देवा, कुत्र्याच्या तावडीतून सोडव, चांदीचा कुत्रा आम्ही अर्पण करू’ असा नवसही बोललो. पण तो कुत्रा दत्तमहाराजांचेही ऐकायला तयार नव्हता. ‘वाचकांच्या पत्रव्यवहारात’ आम्ही भटक्‍या कुत्र्यांच्या त्रासाविषयी भरपूर लिहिले. या संदर्भात आम्ही मनेका गांधींनाही पत्र लिहले पण कोठेच उपयोग झाला नाही. शेवटी आम्हीच आमचा प्रश्‍न सोडवायचा ठरवले. एका मध्यरात्री आम्ही पोते घेऊन, कुत्र्याला पकडले व कात्रजच्या घाटात सोडले.

अनैतिक संबंधाच्या रागातून केला खून; शरीराचे तुकडे टाकले भीमा नदीत!

मात्र, हे करीत असताना सोसायटीचे अध्यक्ष वरून आमची गंमत पाहत असल्याचे  दिसले. पण आम्ही दुर्लक्ष केले. आगामी मिटींगमध्ये त्यांचा राजीनामा मागायचा, असा निर्धार आम्ही केला. कुत्र्याला सोडून घरी आल्यानंतर कित्येक दिवसांनी आम्हाला शांत झोप लागली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळीच सोसायटीच्या आवारात आमच्या निषेधाच्या घोषणा ऐकू येऊ लागल्या. प्राणीमित्र संघटनेचे दहा- बारा कार्यकर्ते मोठमोठे फलक हातात घेऊन, आमचा निषेध करीत होते. सोसायटीच्या अध्यक्षांनीच ही गेम आमच्यावर टाकल्याचे लक्षात आले. संघटनेतील कार्यकर्त्यांनी आम्हाला घेराव घातला. ‘‘तुम्ही कुत्र्याचे अपहरण केले असून, पुढील- तीन चार दिवसांत तो कुत्रा सुखरूपपणे आमच्या ताब्यात दिला नाही तर आमच्याशी गाठ आहे,’’ अशी धमकी त्यातील एका मॅडमने दिली. सध्या आम्ही आठवड्याची रजा टाकली असून, कात्रज घाट परिसरासह इतर ठिकाणी  त्या कुत्र्याचा शोध घेत आहोत. तुम्हाला कोठे सापडला तर प्लीज आम्हाला कळवा.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SL Khutwad Writes about Stray dog