esakal | ‘आरटीओ’ला अंधारात ठेवून ‘बाइक शेअर’;‘उबर’तर्फे दुचाकी प्रवासी वाहतूक सेवा

बोलून बातमी शोधा

rto-pune}

आरटीओच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी खातरजमा केली. त्यानंतर ॲपवर दुचाकी वाहतुकीसाठी दुचाकीचा पर्याय उपलब्ध असल्याचे दिसून आले. त्यामुळे आरटीओने ग्राहक म्हणून ॲपवर बुकिंग  केले. त्यानंतर ८ दुचाकी ताब्यात घेतल्या.

pune
‘आरटीओ’ला अंधारात ठेवून ‘बाइक शेअर’;‘उबर’तर्फे दुचाकी प्रवासी वाहतूक सेवा
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) परवानगी न घेताच ‘उबर’ने शहरात दुचाकीवरून प्रवासी वाहतूक सेवा (बाइक शेअर) सुरू केली. परंतु, हा प्रकार निदर्शनास येताच आरटीओने बुधवारी ८ दुचाकी ताब्यात घेतल्या. दुचाकीवरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही, असेही परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले. 

‘उबर’ने त्यांच्या ॲपवरून प्रवासासाठी दुचाकीचाही पर्याय गेल्या महिन्यापासून उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने शनिवारवाडा ते स. प. महाविद्यालय हा प्रवास दुचाकीवरून केला. याबाबत आरटीओकडे विचारणा केली असता, परवानगी दिलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आरटीओच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी खातरजमा केली. त्यानंतर ॲपवर दुचाकी वाहतुकीसाठी दुचाकीचा पर्याय उपलब्ध असल्याचे दिसून आले. त्यामुळे आरटीओने ग्राहक म्हणून ॲपवर बुकिंग  केले. त्यानंतर ८ दुचाकी ताब्यात घेतल्या.

Fact Check: खरंच अण्णा हजारेंचा भाजप प्रवेश झालाय? जाणून घ्या सत्य

मोटार वाहन कायद्यानुसार 
दुचाकी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी नाही. प्रवासी वाहतूक करण्यासाठी आरटीओकडे वाहनांची प्रवासी नोंदणी करणे गरजेचे असते. तसेच त्यासाठी कर भरावा लागतो. तसेच प्रवाशांचा विमा काढावा लागतो. 

चालकाची पोलिसांकडून पडताळणी करणे गरजेचे असते. या नियमांचे पालन ‘उबर’ने केले आहे का? याची तपासणी करून करण्यात  येणार असल्याचे आरटीओने स्पष्ट केले. 

बारामतीत डझनभर पिस्तुले जप्त; पिस्तुलांचं MP कनेक्शन आलं उजेडात!

दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी कोणत्याही कंपनीला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ‘उबर’ने दुचाकीवरून सुरू केलेली प्रवासी वाहतूक बेकायदा आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे आणि पुढेही करण्यात येईल.
- संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 

खासगी दुचाकीचालकांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी ‘उबर’ प्रयत्न करीत आहे. त्यासाठी त्यांनी ॲपमध्येही बदल केले आहेत. याबाबत आरटीओकडे तक्रारी केल्यावर त्यांनी दुर्लक्ष केले होते. अशा प्रकारच्या व्यवसायांमुळे रिक्षा चालविणाऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे बाइक शेअर हा प्रकार तातडीने बंद केला पाहिजे. 
- डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार सभा 

परीक्षेसाठी कोर्टानं मंजूर केला जामीन; कोंबड्या चोरल्याच्या गैरसमजातून केला होता जीवघेणा हल्ला​

एक हजार जणांचा सहभाग
‘आरटीओ’ला अंधारात ठेवून सुरू करण्यात आलेल्या या व्यवसायात सुमारे एक हजार दुचाकीचालकांनी बाइक शेअरमध्ये सहभाग नोंदविला असावा, असा अंदाज आहे. याबाबत ‘सकाळ’ने ‘उबर’कडे दोन दिवस पाठपुरावा केला. त्यांच्या प्रतिनिधीला ई-मेलही पाठवून ‘आरटीओ’च्या कारवाईबाबत विचारणा केली. परंतु, ‘उबर’ने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

असा करा राष्ट्रीय जेईई मेन्सचा अभ्यास