
पुणे : मागील वर्षीच्या मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या तुलनेत यंदाच्या मार्च ते जुलैच्या लॉकडाऊनमध्ये आत्महत्येच्या घटना कमी आहेत. एकत्र कुटुंबामुळे या आत्महत्या घटल्याचे चांगले चिन्ह असले तरीही कौटुंबिक वाद आणि नैराश्य या दोन कारणांमुळे सर्वाधिक आत्महत्या घडल्याचा निष्कर्ष पुणे पोलिसांच्या मदतीने एसएनडीटी कला व वाणिज्य महाविद्यालयाने केलेल्या अभ्यासातून पुढे आला आहे. तर 'अनलॉक'नंतर आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता, येत नाही त्यासाठी गरीब व मध्यमवर्गीयांकडे जास्त लक्ष देण्याची गरज देखील व्यक्त करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांतर्फे एसएनडीची कला व वाणिज्य महाविद्यालयास लॉकडाऊनच्या काळात शहरात घडलेल्या आत्महत्यांची कारणे व त्याबाबतची मिमांसा करण्याची विनंती केली होती. त्यानुसार या आत्महत्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार मार्च ते जुलै 2019 आणि मार्च ते जुलै 2020 या कालावधीत घडलेल्या आत्महत्येंचा अभ्यास करण्यात आला होता. त्यानुसार, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या माधवी कुलकर्णी, प्रा.मानसी जोशी आणि प्रा.वासंती राजहंस यांच्या पथकाने अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल पोलिसांना दिला. त्याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत सोमवारी दिली.
शहरात मार्च ते जुलै 2019 या कालावधीत 305 आत्महत्येच्या घटना घडल्या. तर, यावर्षी मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळातह 264 आत्महत्येच्या घटना घडल्या. त्यादृष्टीने गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी 13.44 टक्क्यांनी आत्महत्या कमी झाल्या. वयोगट, लिंग व सामाजिक-आर्थिक स्तरावर आत्महत्येमध्ये गतवर्षी यंदा फार बदल नसल्याचे स्पष्ट झाले. लॉकडाऊनमध्ये बहुतांश कुटुंब एकत्र असल्याने आत्महत्या कमी झाल्याचे तर घरात चारपेक्षा कमी व्यक्ती असणाऱ्या कुटुंबात आत्महत्या वाढल्याचाही निष्कर्ष पुढे आला आहे. यंदा कौटुंबिक वाद व नैराश्य या दोन कारणांमुळे जास्त नागरीकांनी जीवन संपविल्याच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये 103 जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे, तर विषप्राशन, उंचावरुन उडी मारणे, स्वतःला दुखापत करुन घेणे व पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बुडाले, नोकरी गेली आणि शाळा बंद झाल्याचा अनेक कुटुंबांवर परिणाम झाला. त्यामुळे अनलॉकमध्ये अशा कुटुंबांकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तसेच मध्यमर्गीय व गरीब कुटुंबातील नागरीकांच्या आत्महत्येचे प्रमाणदेखील जादा आहे. हे चित्र बदलण्यासाठी वस्त्यांमध्ये मानसिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची गरज असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले. तसेच आत्महत्या प्रतिबंधासाठी 'सकाळ सोशल फाऊंडेशन'तर्फे 24 तास मोफत समुपदेशन सेवा सुरू केल्याचेही मानसी राजहंस यांनी सांगितले.
आर्थिक स्तरानुसार माहिती :
वर्ग | 2019 | 2020 |
गरीब | 77 | 89 |
मध्यम | 163 | 136 |
श्रीमंत | 04 | 06 |
माहिती नाही | 74 | 33 |
रोजगारानुसार माहिती :
प्रकार | 2019 | 2020 |
बेरोजगार | 58 | 41 |
घरगुती | 20 | 24 |
शिक्षण | 26 | 20 |
नोकरी | 75 | 78 |
व्यवसायिक | 30 | 21 |
माहिती नाही | 86 | 80 |
कुटुंबातील व्यक्तीनुसार आत्महत्या
कुटुंबातील व्यक्ती | 2019 | 2020 |
0 | 02 | 06 |
1 | 06 | 10 |
2 | 09 | 26 |
3 | 39 | 48 |
4 | 66 | 26 |
5 | 33 | 08 |
6 | 07 | 01 |
आत्महत्येची कारणे
कारण | 2020 |
कौटुंबिक वाद | 42 |
नैराश्य | 38 |
व्यसनाधीनता | 33 |
आजारपण | 29 |
आर्थिक कारण | 09 |
प्रेम प्रकरण | 05 |
माहित नाही | 108 |
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.