The soaked marigold due to heavy from Narodi rain had to be thrown in the field
The soaked marigold due to heavy from Narodi rain had to be thrown in the field

भिजलेला झेंडू देवीच्या चरणी जाण्याऐवजी तोडून फेकावा लागला शेतात

घोडेगाव : लॉकडाऊनमध्ये टोमॅटोचे, कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. मोठे भांडवलामुळे आर्थिक अडचणी आल्या, मग कमी भांडवलाचे झेंडू लावण्याचा निर्णय घेतला. पण मुसळधार पावसाच्या तडाक्याने तोही मातीमोल झाला.
 

भिजलेला झेंडू देवीच्या चरणी जाण्याऐवजी तोडून शेतात फेकावा लागला. नवरात्रात जर पाऊस पडला नाही तरच याचे भांडवल वसूल होईल नाहीतर पुन्हा कर्जाचा डोंगर उभा राहिल. अशा निराशाजनक प्रतिक्रीया दिली आहे, नारोडी (ता.आंबेगाव) येथील शेतकरी अंकुश रावजी पिंगळे यांनी.     

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नारोडी येथील अंकुश पिंगळे हे प्रगतिशील शेतकरी आहेत. घरच्या व मजूरीने आलेल्या माणसांकडून शेती करुन घेण्याचा त्यांचा हात खंड आहे. दरवर्षी टोमॅटो व कांदा या पिकांचे उत्पादन घेणार शिवाय सिझन नुसार चांगला बाजारभावही घेणार. त्यांची एकत्रीत 6 एकर शेती आहे. मार्चमध्ये लागवड केलेली टोमॅटो लॉकडाऊनमध्ये सापडली आणि अक्षरशः सर्वच पिक वाया गेले. भांडवलही वसूल झाले नाही. त्यांना त्यात एक लाख रुपयांचा फटका बसला. कांद्याचे पिकही जोमात आले टोमॅटोमुळे आर्थिक अडचण आली आणि कमी भावात काही कांदा विकला. भांडवलही वसूल झाले नाही मग नशिबाचा खेळावर कमी भांडवलाचे झेंडूचे एक एकरात पिक घेतले. गणपतीला थोडा बाजार मिळाला. पण फुलांना लॉकडाऊनमुळे मागणी नव्हती.

प्रेमाचं नाटक करुन फसवलं; गर्लफ्रेन्ड आणि बाळाला सोडून बॉयफ्रेन्डने काढला पळ
दहा हजार कोरोनामुक्त; आठवडाभरातील आकडेवारीने पुणेकरांना दिलासा 

बाजार समित्या बंद होत्या. आता नवरात्रीला तरी चांगला बाजारभाव मिळेल अशी आशा त्यांना होती. परंतू गेली चार दिवस मुसळधार पावसात फुले भिजली व ती सडून गेली. मजुरीची माणसे घेऊन फुले तोडून शेतात फेकून द्यावी लागली. अंदाजे चार दिवसांत दोन टन फुले फेकून दिली. बाजारभावही कमी आहे. पुढील 8 दिवसात काय बाजारभाव राहील त्यावरच फुलांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. यात भांडवलासह दिड लाख तोटा झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com