Video : गोखलेनगरमध्ये पहा काय घडतंय...; कसा रोखणार कोरोना?

gokhle nagar1.jpg
gokhle nagar1.jpg

गोखलेनगर (पुणे) : पुण्यातील दाट लोकवस्तीसाठी जनवाडी, जनता वसाहत, पीएमसी चाळ, हिरवी चाळ, वैदूवाडी हा परिसर ओळखला जातो. या वस्त्यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. कारण वस्ती पातळीवर अद्याप सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे आदी गोष्टींचे पालन केले जात नाही. या परिसरातील नागरिक सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असल्याने येथे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती येथील नागरिकांना वाटत आहे. 

पुण्यातील गोखलेनगर परिसरात इतरही अनेक समस्या भेडसावत आहेत. या परिसरामध्ये लहान- लहान घरांमध्ये जास्त माणसं राहतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे देखील अवघड आहे. घर लहान असल्याने बहुतांशी नागरिक घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. तरुण मुलं, ज्येष्ठ नागरिक बाहेर घराबाहेर पडून रस्त्यावर टोळक्‍याने गप्पा मारतात. हातावरच पोट असलेल्या नागरिकांनी रोजगारासाठी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. परंतु, ठिकठिकाणी भाजी विक्रेते बसल्याने नियमांचे पालन न करताच ग्राहक भाजी खरेदी करतात. गोखलेनगर, वडारवाडी, चतुश्रृंगी, मॉडेल कॉलनी या परिसरात राहणारे नागरिक भाजी खरेदीसाठी गर्दी करताना दिसतात. 

दिवसेंदिवस गोखलेनगर परिसरामध्ये कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने आजारी नागरिक देखील स्वतः हून तपासणीसाठी पुढे येत नाहीत. मात्र, वस्तू, भाजीपाला, दूध, चिकन, मेडिकल व इतर साहित्य खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर गर्दी करतात. मद्य खरेदीसाठी येणारे नागरिक नियम धाब्यावर बसवून तोंडाला मास्क न लावता येत असल्याचे विक्रेत्याने सांगितले. गोखलेनगर परिसरात आजपर्यंत गोखलेनगर 13, रामोशीवाडी 13, वडारवाडी 13, जनवाडी 36 एवढे कोरोना बाधित रुग्ण या भागात आहेत. तरीदेखील येथे कोणत्याही नियमांचे पालन होत अद्याप होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.

''नागरिक सहकार्य कमी प्रमाणात करतात. थर्मल गण द्वारे तापमान चेक केलं जातं. नागरिकांनी न घाबरता तपासणी करण्यासाठी यावे. आमच्या सोबत रुग्णवाहिका आहे. त्यामध्ये तपासणीचे प्राथमिक साधणे आहेत. नियमाप्रमाणे आम्ही नागरिकांची तपासणी करतो. अधिक तपासणीसाठी रिपोर्ट रुग्णालयांना पाठवतो. नागरिकांनी अफवा पसरवू नये. बीपी, शुगर, अस्थमा असे आजार असणाऱ्या नागरिकांची प्रथम तपासणी करतो. तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम करतो. डॉक्‍टर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आम्ही नागरिकांच्या घरी जाऊन तपासणी करतो'' 
- डॉ. शमा तांबोळी, मेडिकल ऑफिसर राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रम. 

रुग्ण आणायला गेलो की नागरिक सहकार्य करत नाहीत. रूग्णवाहिकेला जाण्या-येण्यासाठी जागा दिली जात नाही. लोकांनी ड्रायव्हरवरती धावून जाऊ नये. रूग्णवाहिकेच्या चालकावरती नागरिक धावून येतात. शिव्या देतात. 
विक्रम रांजगे, खासगी रुग्णवाहिका चालक 
 

 

पाटील इस्टेट परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्‍यात आणण्यासाठी प्रशासनाला जवळपास यश मिळत आहे. याच पद्धतीने गोखलेनगर परिसरातील नागरिकांनी आजारांची लक्षणे वाटल्यास स्वतः हून पुढे येऊन तपासणी करावी. 
- वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

 

कंटेन्मेंट झोन करायचं की नाही याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोन पत्रे आणि बांबू लावून सील केले आहेत. 
किशोरी शिंदे, क्षेत्रीय अधिकारी, शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com