कर्करोगाच्या काही रुग्णांना आता थेट पोटातूनच केमोथेरपी

कर्करोगाच्या काही रुग्णांना आता थेट पोटातूनच केमोथेरपी

पुणे - कर्करोगाच्या काही रुग्णांना सलाइनऐवजी थेट पोटातूनच केमोथेरपी देण्याची पद्धत पुढे आली आहे. अर्थात, जगभराबरोबरच पुण्यातही या नव्या पद्धतीने रुग्णांवर उपचार सुरू झाले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कर्करोगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. या प्रत्येक प्रकारचे हजारो रुग्ण आढळतात. त्यापैकी बहुतांश रुग्णाचे निदान उशिरा होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रभावी उपचार करूनही रुग्णाचे प्राण वाचविणे शक्‍य होत नाही. मात्र, लवकर निदान आणि योग्य औषधोपचार यातून कर्करोग पूर्णतः बरा होऊ शकतो. यासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा वापर केला जातो. केमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि रेडिएशन या तीन पद्धतींचा नियोजनबद्ध वापर करून आतापर्यंत कर्करोगावर उपचार केले जात आहेत. आता वैद्यकशास्त्राने यापुढे एक पाऊल टाकून थेट पोटातून केमोथेरपी देण्याची नवीन पद्धत पुढे आणली आहे. अर्थात, सर्व प्रकारच्या कर्करुग्णांवर या नवीन पद्धतीचा वापर करता येत नाही; पण स्त्रियांच्या जननेन्द्रियाशी संबंधित आणि पोटातील कर्करोग यासाठी हे प्रभावी ठरेल, अशी माहिती पुण्यातील कर्करोग तज्ज्ञांनी दिली.  

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; थोरांदळे येथील घटना
 
अशी देतात पोटातून केमोथेरपी
‘नॅशनल काँम्प्रेहेंन्सीव्ह कॅन्सर नेटवर्क’ने प्रसिद्ध केलेल्या कर्करोगाच्या उपचारामध्ये रुग्णांना पोटातून केमोथेरपी देण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आहे. दोन प्रकारे थेट पोटात केमोथेरपी देता येते. एक म्हणजे, रुग्णाच्या पोटात कॅथेटर वापरून केमोथेरपी दिली जाते. रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये हे उपचार केले जातात. तर, दुसऱ्या प्रकाराला वैद्यकीय परिभाषेत ‘हायपेक’ म्हणतात. त्यात कर्करोगाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला पोटातून केमोथेरपी दिली जाते. रुग्ण शस्त्रक्रियेच्या टेबलवर असताना ही प्रक्रिया केली जाते. त्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय उपकरणाचा वापर केला जातो.

आधुनिक उपचार पद्धतीमुळे कर्करोगावर प्रभावी उपचार करणे शक्‍य होतात. आपल्याकडे अद्यापही ३५ ते ४० टक्के रुग्णांचे कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात निदान होते. या पार्श्वभूमीवर कर्करोग उपचाराच्या नवीन पद्धतींचा काही रुग्णांना फायदा होण्याची शक्‍यता वाढते.
- डॉ. अनंतभूषण रानडे, कर्करोग तज्ज्ञ

पोटातून आणि शस्त्रक्रियेनंतर देण्यात येणारी केमोथेरपी वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज रुग्णालयात करण्याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या दोन्ही उपचार पद्धतींमध्ये रुग्णाची निवड महत्त्वाची असते. कारण सर्व प्रकारच्या आणि सगळ्याच कर्करोगाच्या रुग्णांवर हे उपचार करता येत नाहीत; पण योग्य रुग्णांवर हे उपचार प्रभावी ठरतात. 
- डॉ. अमित भट्ट, कर्करोग तज्ज्ञ

हे सर्वांत महत्त्वाचे
नेमक्‍या कोणत्या रुग्णावर हे उपचार करायचे, यासाठी रुग्णाची अचूक निवड हे या दोन्ही प्रक्रियेसाठी महत्त्वाचे ठरते. विशेषतः ‘हायपेक’मध्ये रुग्णाची निवड चुकल्यास उपचारातील गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com