esakal | पुण्यातील काही मार्ग आजही बंद राहणार
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पुण्यातील काही मार्ग आजही बंद राहणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागात नागरिकांची गर्दी वाढल्याने वर्दळीचे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व बाजीराव रस्ता रविवारी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. याच पद्धतीने सोमवारीही गर्दी पाहून आवश्‍यकतेनुसार, दोन्ही रस्ते तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रविवारी झालेल्या गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे वाहतूक शाखेने शिवाजी रस्ता व बाजीराव रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. तो रात्री आठनंतर वाहतुकीसाठी पूर्ववत केला.

गणेशोत्सवातील गर्दी पाहून आवश्‍यकतेनुसार व तात्पुरत्या स्वरूपात शिवाजी व बाजीराव रस्ता सोमवारीही वाहतुकीसाठी बंद ठेवला जाईल. गर्दी कमी झाल्यास त्यानुसार रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत केली जाईल.

- राहुल श्रीरामे,

पोलिस उपायुक्त, वाहतुक शाखा

हेही वाचा: Pune : मालवाहू विमान खरेदीला मंजुरी

गणेशोत्सव काळात आवश्‍यकतेनुसार व तात्पुरत्या स्वरूपातील वाहतुकीतील बदल

  1. शिवाजीनगरहून स्वारगेटला जाणारा शिवाजी महाराज रस्ता स. गो. बर्वे चौकातून मोठ्या वाहनांना वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येईल. वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता मार्गे पुढे जावे.

  2. स्वारगेटहून शिवाजीनगरला जाणाऱ्या बाजीराव रस्त्यावरील वाहतूक पुरम चौकातून वळविण्यात येईल. वाहने स्वारगेट, सारसबाग, पुरम चौक, टिळक रस्ता, टिळक चौक, खंडुजीबाबा चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याने पुढे जातील.

असा करा प्रवास

  1. पुणे विद्यापीठाकडून स्वारगेट, हडपसरला जाण्यासाठी जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता किंवा लाल बहादूर शास्त्री रस्त्याने स्वारगेटला जावे तसेच सेनापती बापट रस्ता, नळस्टॉपमार्गे स्वारगेटला पोचता येईल.

  2. कात्रज, स्वारगेटहून शिवाजीनगरला जाण्यासाठी पुरम चौकातून टिळक रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याने पुढे जाता येईल.

  3. नगर रस्त्यावरून स्वारगेट, कात्रजला जाण्यासाठी पुणे स्टेशन येथून नेहरू रस्त्याने सेव्हन लव्हज चौकातून स्वारगेटकडे किंवा मार्केट यार्डकडे जाता येईल.

loading image
go to top